नांदेड| दुर्गा विसर्जना निमित्त भाजपा महानगरचे सुरेश लोट यांच्या वतिने विसर्जन मिरवणूक आलेल्या सर्व दूर्गा मंडळांच्या अध्यक्षांचा सत्कार करुन हजारो दुर्गाभक्तांसाठी भव्य महाप्रसादाचे व संगीत रजनीचे २७ व्या वर्षी आयोजन करण्यात आले.
गोवर्धन घाट येथे उभारण्यात आलेल्या भव्य शामियानामध्ये भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष प्रविण साले यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारीणी सदस्य बाळू खोमणे, सरचिटणीस विजय गंभीरे, धर्मभूषण ॲड दिलीप ठाकूर, अशोक पाटील धनेगांवकर, व्यंकट मोकले, बालाजी पुणेगावकर, व्यंकटेश जिंदम, बागड्या यादव ,अनिलसिंह हजारी, राज यादव, मारोती वाघ, संतोष परळीकर, माजी नगरसेवक किशोर यादव , सुनील रामदासी,सुरेश निल्लावार,अक्षय अमिलकंठवार यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटनानंतर आलेल्या सर्व भाविक भक्तांना स्वादिष्ट चण्याचा महाप्रसाद वितरित करण्यात आला. मिरवणुकीत सहभागी झालेल्या सर्व दुर्गा माता मंडळाच्या अध्यक्षांचा व भाजप पदाधिकाऱ्यांचा शाल आणि पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
स्वरराज कलामंच च्या रागिनी जोशी व ब्रह्मा कुलकर्णी यांनी एकापेक्षा एक सुंदर गाणी सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे रंगतदार सूत्रसंचलन भाजपा जिल्हा सरचिटणीस दिलीप ठाकूर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोहनलाल यादव काका, डॉ संतोष यादव, शिवा लोट, शिवचरण लोट, नरेश लोट , नितीन गिरडे पाटील, शंकर वानेगावकर, कुणाल गजभारे गणेश भगत, राजेश यादव ,धनंजय आप्पा, विलास भराडे, अंकुश डुबुकवाड शेख अनिस, कार्तिक बतीन यांनी परिश्रम घेतले. भाजपमध्ये प्रवेश घेतल्याबरोबर तीन मोठे कार्यक्रम घेतल्याबद्दल सुरेश लोट यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.