आशिष हिवरेंचे शासकीय औद्योगीक कामगार संघटनेला आश्वासन
नांदेड| सामाजिक वनीकरण विभागातील कामगारांचे प्रलंबित प्रश्न आठवड्याभरात सोडवुन त्यावर अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय अधिकारी आशिष हिवरे यांनी शासकीय औद्योगीक कामगार संघटनेला दिले आहेत.
आयटक प्रणित शासकीय औद्योगीक कामगार संघटनेच्यावतीने सामाजिक वनीकरण विभागातील कामगारांच्या धर्माबाद, उमरी, मुखेड, कंधार रेंजमधील कामगारांचे थकीत वेतन तातडीने अदा करावे, वेतनातील फरकाची रक्कम तात्काळ देण्यात यावी, काम करणार्या व्यक्तीच्याच नावाने पगार काढावा, अनिष्ठ प्रथा बंद कराव्यात यासह अन्य प्रलंबित प्रश्नांसाठी बेमुद्दत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले होते.
यावेळी संघटना प्रतिनिधींसोबत चर्चा करतांना हिवरे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलनाची यशस्वी सांगता करण्यात आली. यावेळी कामगार नेते ऍड.कॉ.प्रदीप नागापूरकर, कॉ.अब्दुल गफार, कॉ.शिवाजी फुलवळे, कॉ.पिराजी घाटे, कॉ.संजय राठोड, कॉ.गंगाराम सूर्यवंशी, कॉ.रामजी कांबळे, कॉ.गौसबी, कॉ.विश्वनाथ डुमणे, कॉ.सुशिला यलम्मा, कॉ.अशोक धनुकवाड, कॉ.वत्सलाबाई घोंगडे, कॉ.शिवाजी भेदे आदी उपस्थित होते.