निवडणूक ओळखपत्राशी आधार जोडणी बाबत जनजागृती चलचित्रवाहनांस हिरवी झेंडी दाखवून केले आवाहन
नांदेड। जिल्हयात निवडणूक ओळखपत्राशी आधार जोडणी बाबत जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे मार्फत मतदान केंद्रावर शिबिरांचे आयोजन करण्यात आले,बिएलओ घरोघरी जाऊन मतदारांची आधार जोडणी करीत आहेत त्यानुसार जिल्ह्यात पन्नास टक्के आधार जोडणी झाली असली तरी नांदेड शहरात मात्र ही टक्केवारी कमी आहे. शहरी भागातील मतदारांची मोठी संख्या लक्षात घेता मतदारांमध्ये जनजागृती करणेसाठी फिरते वाहनास जिल्हाधिकारी अभिजित राऊत व पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली.
याप्रसंगी उपजिल्हानिवडणूक अधिकारी दीपाली मोतीयेळे, जिल्हाय माहीती अधिकारी श्री रापतवार, तहसीलदार किरण अंबेकर, नायब तहसीलदार स्नेहलता स्वामी, ऊर्मिला कुलकर्णी यांचे सह जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसिलदार डी.एन. पोटे, श्री फय्याज अहेमद खान (अ.का.), श्री शरद बोरामने (म.स. ) व इतर कर्मचारी उपस्थित होते.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोतीयेळे यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाऊन उपविभागीय अधिकारी तहसिलदार यांचे बैठका घेऊन कामास गती दिली, मतदान केंद्रावर विशेष शिबिरे ही आयोजित केली गेली ,शंभर टक्के आधार जोडणी केलेल्या ,बिएलओ यांचा ही सत्कार करण्यात आले, महाविद्यालये,शाळांमार्फत ही राष्ट्रीय सेवायोजना स्वयंसेवक नेमून तशी जनजागृती करण्यात आली. मतदारांनी जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आपली आधार जोडणी करून घ्यावी असे आवाहन याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.