अर्धापूर| काॅग्रेसचे नेते खा.राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यत तब्बल ३५७० कि मी पायी पदयात्रा राज्यात येताच नांदेड जिल्ह्यासह राज्यात कार्यकर्ते व विविध सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी ही पदयात्रा यशस्वी करावी,असे पदयात्रेच्या तयारीचा अर्धापूरात आढावा घेतांना त्यांनी सांगितले.
अर्धापूर शहरानजीक पार्डी (म) रस्त्यावर राजहंस मंगलकार्यालयात शनिवारी भोकर,हादगाव,किनवट या तिन विधानसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी अशोकराव चव्हाण हे होते तर प्रमुख पाहुणे गटनेते आ.अमरनाथ राजूरकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, नामदेवराव केशवे,गणपतराव तिडके,बि. आर.कदम, संचालक नरेंद्र चव्हाण, सरचिटणीस संजय देशमुख लहानकर, युवकचे जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील कोंढेकर,तालुकाध्यक्ष बालाजी पाटील गव्हाणे,शहराध्यक्ष राजेश्वर शेटे,ओबीसीचे रोहीदास जाधव,जगदीश पाटील भोसीकर,उद्धवराव पवार, आनंद भंडारे,बाळासाहेब बारडकर,माधव कदम, बाळासाहेब रावणगावकर, प्रकाशराव भोसीकर, सुर्यकांत रेड्डी, नारायण श्रीमनवार, संजय राठोड, संजय माने,मारोती शंकतिर्थकर,खजू इनामदार, सुभाष राठोड,यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी अशोकराव चव्हाण म्हणाले कि, ही पदयात्रा जनतेच्या विक्रमी सहभागाने ऐतिहासिक ठरत आहे, त्यामुळे देगलूर पासून पार्डी (म) पर्यंत नियोजनबध्द कार्यकत्यांनी पदयात्रेत विविध घटकांतील लोकांना सहभागी करून घेऊन पदयात्रा नांदेड जिल्ह्यात यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील रहावे, नांदेड येथील सभेला मोठमोठी नेतेमंडळी येणार असल्याने जनतेंनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहण्याचे आवाहन केले. त्यांनी सुक्ष्मपणे सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचा यावेळी आढावा घेतला, बिमार असलेल्यांनी जास्त पायी चालू नये. पदयात्रेत कोणी अचानक बिमार पडल्यास रुग्णवाहिका,डॉक्टर यांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक गावातून मोठ्या संख्येने महिला-पुरुष सहभागी होऊन जनआंदोलनाचे स्वरूप प्राप्त व्हावे. प्रत्येकांनी भारत जोडो पदयात्रा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील रहावे असे सांगितले. यावेळी आ.अमरनाथ राजूरकर यांनी खा.राहुल गांधी यांची १० आॅक्टोंबरला दुपारी ३ वा. नांदेड़ शहरातील नवीन मोंढ्यातील सभेला मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते,महिला,जनतेंनी स्वयंस्फुतीने उपस्थित राहण्याची विनंती करुन कार्यकर्त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या तर नागेलीकर यांनी जिल्यातील तयारी विषद केली. सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी आपापल्या भागातील तयारीचा आढावा सादर केला,या पदयात्रेत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जिल्हा सचिव निळकंठराव मदने यांनी तर आभार शहराध्यक्ष व्यंकटेश शेटे यांनी मानले, यावेळी राजू बारसे,छत्रपती कानोडे,संचालक मोतीराम जगताप, साहेबराव राठोड, व्यंकटराव साखरे,बळवंत इंगोले,रणजितसिंह कामठेकर, भगवान तिडके,नगरसेवक गाझी काजी,सलीम कुरेशी, प्रवीण देशमुख, सोनाजी सरोदे,आर के दाभडकर,आनंदराव कपाटे,नवनाथ कपाटे,संजय लोणे, ज्ञानेश्वर राजेगोरे, अमोल डोंगरे,राजकुमार जाधव,परमेश्वर बंडाळे, ज्ञानेश्वर राजेगोरे,शंकरराव टेकाळे, दिगंबर तिडके,भिमराव कल्याणे,बाळू पाटील,पंडीत लंगडे,रामचंद्र मुसळे, व्यंकटी राऊत,डॉ आनंद शिंदे,शेख मकसूद यांच्यासह सात तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची आदिंची उपस्थिती होती.