नांदेड| जातीयवादी शक्तिंना रोखण्यासाठी व देशातील अल्पसंख्यांक समुदायाच्या न्याय हक्कासाठी लढा उभारणाऱ्या आॅल इंडिया तन्जीम-ए-इन्साफ संघटनेची सर्व जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करुन इन्साफची राज्यभरात पुनर्बांधणी करणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष एस.जी.शुत्तारी यांनी दिली. तन्जीम ए इन्साफ नांदेड जिल्ह्याच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
देशात धर्मनिरपेक्ष विचाराच्या व्यक्तींना सोबत घेऊन सामाजिक कार्यासह अल्पसंख्यांक समुदायाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजनैतिक न्याय-हक्कासाठी संघर्ष, आंदोलन करणाऱ्या आॅल इंडिया तन्जीम-ए-इन्साफची आढावा बैठक नांदेड येथे दि. २७27 रोजी संपन्न झाली. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष एस.जी.शुत्तारी, महासचिव अशफाक सलामी, डाॅ.नईम साब, भाकपा नेते काॅ.प्रदिप नागापुरकर, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता फारुक अहमद, अॅड.शेख बिलाल यांची उपस्थिती होती. प्रदेश महासचिव अशफाक सलामी म्हणाले की, देशातील फॅसिस्ट शक्तींच्या विरोधात धर्मनिरपेक्ष नागरिकांनी एकत्र येऊन लढा उभारला पाहिजे. यात युवकांची भुमिका महत्वाची असते.
राज्यात इन्साफ संघटनेची पुनर्बांधणी करुन अल्पसंख्यांक समाजाच्या प्रश्नांसाठी लढा उभारणार असल्याचे मनोगत व्यक्त केले. यासह मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेख रियाज तर सुत्रसंचलन आमेर अरसील व आभार महेताब शेख यांनी मानले. यावेळी मोहम्मद कासिम, उबेद बा हुसेन, ईशान खान, मोईन कुरेशी, शाहेद उल इस्लाम, सुनिल सोनसळे, वलियोद्दीन फारुखी बिलोली, आरिफ शेख नायगाव, सद्दाम पटेल नरसीकर, इर्शाद पटेल देगलूर, अदनान पाशा, नईम मुल्ला मुखेड, आरिफ पठाण धामणगावकर आदी सह आजी-माजी पदाधिकारी सदस्य, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.