नविन नांदेड। जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समिती अंतर्गत मुख्याध्यापक व क्रिडा शिक्षक यांची कार्यशाळा प्रादेशिक परिवहन कार्यालय, नांदेडच्या वतीने श्री गुरुगोबिंदसिंग इंजिनिअरींग कॉलेज येथे १२आक्टोबंर रोजी आयोजित करण्यात आली होती यावेळी रस्ता सुरक्षाबाबत पथनाटय सादर करण्यात आले.
परिवहन कार्यालय नांदेड चा वतीने जिल्हा स्कुल बस सुरक्षितता समिती अंतर्गत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या वेळी रस्ता सुरक्षा बाबत पथनाट्य सादर करण्यात आले,या पथनाटयामध्ये ज्ञानमाता इंग्लिश स्कूल व नागार्जुना पब्लीक स्कूलच्या विद्याथ्र्यांनी सहभाग घेतला. रस्ता सुरक्षा संदर्भात कुमारी क्षताक्षी महेश चक्रवार हिने भाषण केले. तसेच डॉक्टर सुनील कुलकर्णी यांनी प्राथमिक जीवन प्रणालीबाबत ( CPR ) प्रात्याक्षीक सादर केले. अपघातामध्ये एखादा व्यक्ती बेशुध्द झाल्यास किंवा इतर कारणारे बेशुध्द झाल्यास त्यास कसे जीवदान द्यावे असे प्रात्यक्षिकामध्ये प्रत्यक्ष सांगितले. सदर कार्यक्रमात रस्ता सुरक्षा संबंधी सर्व उपस्थितांना शपथ देण्यात आली.अविनाश राऊत, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, संदिप निमसे,सहा.प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. वैभव डूब्बेवार यांनी कार्यक्रमाचे नियोजन करुन सर्वांना रस्ता सुरक्षा संदर्भात मार्गदर्शन केले,
जिल्हा स्कूल सुरक्षितता समिती नियमावली २०११ याबद्दल सर्व उपस्थित मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे जिल्हयातील सर्व विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक होण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा स्कूलबस समिती असते. तर शाळा स्तरावर शालेय परिवहन समिती असते.शालेय परिवहन समिती सर्व शाळेमध्ये स्थापन करुन त्याच्या नियमानुसार बैठकी आयोजित कराव्यात आणि विद्यार्थी वाहतुकी संदर्भात सुधारणात्मक निर्णय घ्यावेत असे या कार्यशाळे मध्ये ऊप प्रादेशिक कार्यालयाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री. गुरुगोबिंदसिंग इंजिनिअरींग कॉलेजचे संचालक यशवंत जोशी हे होते,तसेच अरुण पाटील, अधिष्ठाता व वैभव डूब्बेवार, सहा. मोटार वाहन निरीक्षक व शिक्षण विभागाच्या वतीने रोहित दासराव बसवते व सेवानिवृत्त प्राचार्य अशोक कामटाणे हे उपस्थित होते. सदर कार्यशाळेसाठी जवळपास ३०० शिक्षकांनी सहभाग नोंदविला.