अर्धापूर तालुक्यातील पार्डी येथे ८ नोव्हेंबरला खा.राहुल गांधी यांचा मुक्काम -NNL


अर्धापूर, निळकंठ मदने|
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी सर्वव्यापी केंद्र सरकारच्या महागाई व जातीजातीत तोडणाऱ्या कृतीच्या विरोधात अर्धापूर तालुक्यात भारत जोडो यात्रेचे ८ नोव्हेंबरला आगमन होणार असून तब्बल २० कि मी अंतर कापून दुपारचा नाष्टा व रात्रीचा एक मुक्काम पार्डी (म) येथे होणार आहे, त्यामुळे गांधी घराण्यातील पहिलेच व्यक्ती खा राहुल गांधी यांचा मुक्काम तालुकावासीयांना मिळाला आहे.

देशात जातीजातीत उच्च-निच्च, हिंदू-मुस्लीम, विविध जातींना विशिष्ट जागी बांधून देशभर जनतेत मोठा संभ्रम निर्माण केला आहे, त्यामुळे जनता जाती जातीत विभागली आहे,देशात गॅस, पेट्रोल, डिझेल,खत,यासह मोठी भाववाढ, महत्वाच्या कंपनीचे झपाट्याने खाजगीकरण,चुकीचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न, केंद्र सरकारच्या  ईडी, सीबीआय,सह सर्व संस्थांचा राजकीय विरोधकावर मोठा दुरुपयोग, न्यायव्यवस्थेत कमालीचा हस्तक्षेप, देशाची हुकुमशाही कडे वाटचाल, विरोधी पक्ष,छोटे राजकीय पक्ष संपविण्याचा सपाटा,कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र सह आदि राज्यातील जनतेने निवडून दिलेले राज्य सरकारे आमिष दाखवून,ईडी,सीबीआय ची चौकशी लावण्याच्या भीतीने पाडून लोकशाहीचा अंत करणे,यासह सतेचा मोठ्या प्रमाणावर दुरुपयोग करणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात सर्वव्यापी खेळाडू, जेष्ठ नागरिक,विविध संघटना, सामाजिक संघटना, सर्वसामान्य जनता यांना सोबत घेऊन खा.राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर तब्बल ३५५० कि.मी.अंतराची पायी पदयात्रा निघाली आहे.

सप्टेंबरला कन्याकुमारी पासून यात्रेस प्रारंभ झाला असून, या यात्रेला सर्व क्षेत्रातून मोठा पाठिंबा मिळत आहे, त्यामुळे ही यात्रा ऐतिहासिक ठरली आहे, नांदेड जिल्ह्यासह राज्यात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी या यात्रेचे सुक्ष्मपणे सर्व नियोजन करीत असून,याकामी आ.अमरनाथ राजुरकर,माजी मंत्री डि पी सावंत,सह जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, नारायण श्रीमनवार,सभापती किशोर स्वामी सर्व टीम प्रयत्नशील आहे.आंध्रप्रदेशातून महाराष्ट्रात ही यात्रा नांदेड जिल्ह्यातील देगलूर, नायगाव,तुप्पा, नांदेड मार्गे अर्धापूर तालुक्यात येत आहे.

आसना नदीपासून अर्धापूर तालुक्यात भारत जोडो यात्रेचा प्रवेश होणार असून, पिंपळगाव ( म) येथील विठ्ठलराव देशमुख मंगलकार्यालयात दुपारचे जेवण आहे. तर अर्धापूर मार्गे पार्डी(म) येथे यात्रेचा मुक्काम होणार आहे. पार्डी येथून हिंगोली जिल्ह्यात यात्रेचा प्रवेश होणार असून,वाशीम मार्गे ही यात्रा पुढे चालणार आहे.नांदेड - वारंगा रस्ता क्र. ३६१ महामार्गावरील रस्त्याचे काम रखडलेले आहे. हे काम लवकर करावे  यासाठी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी नांदेड येथे बैठक घेऊन आदेश दिले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरील कामाचा वेग वाढलेला दिसत आहे. अनेक ठिकाणी रस्ता डांबरीकरण किंवा सिमेंट ने जोडलेला नसल्याने सर्वत्र धुरळा उडत आहे, अर्धापूर तालुक्यातून भारत जोडो यात्रा तब्बल २० कि मी अंतर चालणार आहे,या यात्रेची तयारी मोठ्या प्रमाणावर संबंधित करीत आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी