उच्च ध्येय गाठण्यासाठी स्वतःची स्पर्धा स्वतःशी करायला शिका - मकरंद अनासपुरे -NNL

राष्ट्रचेतना- २०२२ आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवाचा समारोप 


नांदेड|
मराठवाड्यातील विद्यार्थ्यांमध्ये सुप्त कला गुण आहेत, मराठवाडा हे कलेचे माहेर घर असून या मातीतून अनेक कलावंत घडले आहेत. कुठलीही कला सादर करताना स्पर्धकांनी न्यूनगंड न बाळगता आपली कला सादर करावी. मी ही मराठवाड्यातल्या मातीतून घडलेला आहे. कुठल्या भाषेची किंवा त्या भागाची तमा न बाळगता माझा आजवरचा प्रवास आहे. 

आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर पहिल्यांदा स्वतःची स्पर्धा स्वतःशी करायला शिका. यश आपोआप मिळते, असे प्रतिपादन प्रसिद्ध सिनेअभिनेता मकरंद अनासपुरे यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि ग्रामीण टेक्निकल अँण्ड मॅनेजमेंट कॅम्पस, विष्णुपुरी, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यापीठाच्या ‘राष्ट्रचेतना -२०२२’ आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवाच्या पारितोषिक वितरण व समारोप समारंभ प्रसंगी आज बुधवार, दि.१२ ऑक्टोबर, रोजी लोकशाहीर वामनदादा कर्डक कलामंचावर मार्गदर्शक करतांना केले. 

अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. उद्धव भोसले, माजी कुलगुरु डॉ. पंडित विद्यासागर, हॅप्पी इंडिया व्हिलेजचे संस्थापक रवी बापटले, अधिष्ठाता डॉ. अजय टेंगसे, डॉ. एल. एम. वाघमारे, परीक्षा मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मालिकार्जून करजगी, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, प्राचार्य डॉ. विजय पवार, नांदेड गुरुद्वाराचे बाबा कुलदीपसिंघ, स्वागताध्यक्ष संजय पवार, विद्यार्थी विकास समिती सदस्य, विद्यार्थी विकास सल्लागार समितीचे सदस्य यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना मकरंद अनासपुरे म्हणाले की, कला ही कुठल्याही वर्ग आणि वर्णाची नसून ती कुणालाही कष्टाने मिळवता येते. प्रत्येक विद्यार्थीला प्रतिकूल परिस्थितीतून जावे लागते. त्यामुळे खचून न जाता त्यातून मार्ग काढत आपले ध्येय गाठावे. विद्यार्थी आणि शिक्षक यांचे नाते पालकापेक्षा महत्वाचे असते. जीवनात यशस्वी होण्यासाठी दररोज एक पुस्तक विद्यार्थ्यांनी वाचण्या साठी वेळ द्यावा. स्वतःशी स्पर्धा स्वतःशी करा म्हणजेच यश मिळण्याचा मार्ग मोकळा होतो, असे ते बोलताना म्हणाले. 

माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर मार्गदर्शन करताना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी कला सादर करणे म्हणजे अभ्यासाव्यतिरिक्त कला समजली जात होती. परंतु आता नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात कलेला वेगळास्तर मिळालेला आहे. त्याचा उपयोग विद्यार्थ्यांनी करावा, असे ते म्हणाले. विद्यापीठाचे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव यांनी कार्यक्रमाची प्रस्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.विश्वधार देशमुख आणि डॉ. कमलाकर चव्हाण यांनी केले तर आभार डॉ. ओमप्रकाश दरक यांनी मानले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी