पुणे। समाजपरिवर्तनाच्या कार्यात विविध क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या बारा व्यक्तींना 'सम्यक पुरस्कार २०२२' देऊन रविवारी पुण्यात गौरविण्यात आले.आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते वसंतराव साळवे यांच्या हस्ते गणेश कला क्रीडा मंदिर येथे ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.फुले-आंबेडकर लोकसेवा प्रतिष्ठान,मातंग युवा परिषद आणि सम्यक पुरस्कार वितरण समिती यांनी संयुक्तपणे या कार्यक्रमाचे आयोजन केले. या पुरस्काराचे हे १३ वे वर्ष होते.
प्रकाशकुमार वाघमारे दिग्दर्शित 'भीमा तुझ्या जन्मामुळे ... ' या महानाट्याचा ५० वा प्रयोग या कार्यक्रमात झाला. या महानाट्याला मोठा प्रतिसाद मिळाला.आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते वसंतराव साळवे,अंकल सोनवणे हे मान्यवर उदघाटन प्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजक मिलिंद अहिरे, संजय आल्हाट आणि नागेश भारत भोसले यांनी स्वागत केले.
नाथाभाऊ भोसले,रोहिदास गायकवाड,अशोक पगारे,रामदास साळवे,मिलिंद गायकवाड, अभय भोर,राहुल डंबाळे,जावेद खान,पंकज धिवार,अविनाश कांबळे,दीपक गुजर, सोमनाथ डाके या विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींचा 'सम्यक पुरस्कार २०२२' देऊन गौरव करण्यात आला. अंकल सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. घटनेच्या उद्देशिकेच्या सामूहिक वाचन करण्यात आले. दीपक म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले. विलास घोगरे यांनी आभार मानले.