नवीन नांदेड। महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ नवीन नांदेड आयोजित दिवाळी पहाट संगीत सभेला हडकोकरांनी उत्तम प्रतिसाद देत उपस्थिती लावली होती. यावेळी या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजन बदल आ. मोहनराव हंबर्डे यांनी पत्रकारांचे कौतुक केले.
सण उत्सवाच्या निमित्ताने समाजात आनंद पसरतो, दिवाळी हा सण मोठा असुन दिवाळी पहाट असे उपक्रम अभिनंदनीय आहेत असे प्रतिपादन यावेळी बोलताना, आ.मोहनराव हंबर्डे यांनी केले. शुक्रवार (ता. २८) रोजी, हडको दत्तकृपा मंगल कार्यालय येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने, दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी आ. मोहनराव हंबर्डे यांच्यासह वैशाली चिखलीकर, भाजयुमो जिल्हाध्यक्ष संजय पाटील घोगरे, सभापती आनंदराव पाटील शिंदे, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड अघ्यक्ष माधव देवसरकर, माजी नगरसेवक अँड. संदीप पाटील चिखलीकर, नगसेविका बेबीताई गोपिले,सिडको भाजपा मंडळ अध्यक्ष वैजनाथ देशमुख, गजानन कत्ते,सामाजिक कार्यकर्ते मोहन पाटील घोगरे, अँड. जयसिंग हंबर्डे, बाबुराव घोगरे, शिवानंद निल्लावार, श्याम हंबर्डे, डॉ.अशोक कलंत्री,शिवाजी लुटे ,याचा सह मान्यवरांची उपस्थिती होती.
प्रास्ताविक आयोजक तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संग्राम मोरे, यांनी केले संचालन दिगंबर शिंदे तर मुकेश घोगरे यांनी आभार मानले. पंडीत लक्ष्मीकांत रवंदे यांच्या संचाने भावगीते, भक्तीगीते यावेळी सादर करण्यात केली, यास प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संग्राम मोरे, बापूसाहेब पाटील आनिस घोगरे, संतोष गुट्टे, शिवा हंबर्डे, कैलास हंबर्डे, मुकेश घोगरे, सुजीत घोगरे, महेश घोगरे, मोनु जोशी, पिंटु भारती, अंकुश घोरबांड, अजय घोगरे, उमेश स्वामी आदीनी परिश्रम घेतले.