एमबीबीएससाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या वतीने सत्कार -NNL


शिवणी, प्रकाश कार्लेवाड।
तालुक्यातील मौजे झळकवाडी येथे किनवट माहूर तालुक्याचे माजी आमदार प्रदीप नाईक यांनी  दिनांक २७ ऑक्टो रोजी अचानक भेट देऊन येथील आदिवासी समाजाचे दोन विद्यार्थी एम.बी.बी.एस.साठी व एक बी.ए.एम.एस. साठी पात्र झाल्याचे समजताच त्या तिन विद्यार्थ्यांचा सत्कार करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

किनवट तालुक्यातील अतिदुर्गम व डोंगराळ भागात वसलेल्या मौजे झलकवाडी वाडी येथील शेतकरी पुत्र देविदास आनंदराव झळके एम.बी.बी.एस.शिवराज सोमाजी कुरडे एम.बी.बी.एस.  व दत्ता सुरेश झळके बी.ए.एम.एस.च्या वैद्यकीय २०२१-२२ या वर्षीच्या पूर्व परीक्षेत यशस्वी रित्या गुण संपादीत करून घवघवीत यश मिळाल्या बद्दल किनवट माहूर तालुक्याचे माजी आमदार प्रदीप नाईक यांनी स्वतः भेटून वरील तीन विध्यार्थ्यांचे पुष्पहार घालून सत्कार केले व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.  

यावेळी किनवट तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाअध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड, किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल पाटील कराळे, किनवट तालुका युवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाअध्यक्ष राहुल नाईक, शिवराम जाधव,जयवंत वानोळे, डॉ. गंगासागर, डॉ. सुभाष  वानोळे, बाळासाहेब शेरे,मनोज राठोड, प्रभाकर बोडेवार,जगदीश माने, शिवाजी बोटेवाड, निर्गुण पाटिल, भोजराज देशमुख, संतोष जाधव, दिगांबर बोंदरवाड, शेख जब्बार तल्हारीकर, रोषणखान पठाण,अंदबोरी चे सरपंच  बंडु उरे, पांगरपहाड चे सरपंच संदेश जाधव, नारायण झळके,विजय राठोड आदि उपस्थित होते.

यासह झळकवाडी चे नवनिर्वाचित सरपंच प्रतिनिधी देविदास झळके व उपसरपंच प्रतिनिधी लक्ष्मण खोकले आणि नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचे  सत्कार माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या वतीने करण्यात आला. यावेळी गावातील नागरिक मोठया प्रमाणात उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी