शेतकरी पुञ संघर्ष समितीच्या आमरण उपोषणानंतर 414 कोटी रुपयाचा पिक विमा मंजुर
नांदेड। केंद्राच्या सबसिडी येणे शिल्लक असल्याने शेतकर्यांना दिवाळीत मदत मिळत नाही त्याकडे खासदार साहेबांनी लक्ष द्यावे. जर खासदार प्रतापराव पाटील चिखलीकरांच्या पाठपुराव्यामुळे पिकविमा मंजुर असेल तर सबसिडी केंद्राने अडवुन धरली नसती आणि इतर जिल्ह्याप्रमाणे दिवाळीपुर्व वाटप केली असती पण त्याकडे लक्ष नं देता श्रेय घेण्याचा खटाटोप खासदारांनी चालविला शेतकरी पुञ संघर्ष समितीच्या आमरण उपोषणाच्या यशानंतर दुसरेचं श्रेय घेत असल्याचा आरोप शेतकरी पुञ संघर्ष समितीने केला.
तर ए। का सोयाबीन पिकाला 391 कोटी मंजुर -- सोयाबीन पिकाच्या तालुकानिहाय इतक्या शेतकर्यांना लाभ जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील 27 हजार 720 शेतकऱ्यांना 13 कोटी 76 लाख, भोकर तालुक्यासाठी 38 हजार 253 शेतकर्यांना 22 कोटी 15 लाख, बिलोली साठी 53 हजार 653 शेतकर्यांना 27 कोटी 76 लाख, देगलूर साठी 54 हजार 71 शेतकर्यांना 33 कोटी 3 लाख, धर्माबाद साठी 26 हजार 819 शेतकर्यांना 14 कोटी 93 लाख, हदगाव साठी 74 हजार 487 शेतकर्यांना 46 कोटी 78 लाख, हिमायतनगर साठी 25 हजार 307 शेतकर्यांना 15 कोटी 05 लाख, कंधार साठी 89 हजार 543 शेतकर्यांना 36 कोटी 83 लाख, किनवट साठी 20 हजार 934 शेतकर्यांना 12 कोटी 43 लाख, लोहा साठी 90 हजार 115 शेतकर्यांना 40 कोटी 59 लाख, माहूर साठी 16 हजार 5 शेतकर्यांना 10 कोटी 46 लाख, मुदखेड साठी 28 हजार 384 शेतकर्यांना 13 कोटी 89 लाख, मुखेड साठी 82 हजार 69 शेतकर्यांना 43 कोटी 51 लाख, नायगाव साठी 64 हजार 970 शेतकर्यांना 30 कोटी 53 लाख, नांदेड साठी 39 हजार 878 शेतकर्यांना 16 कोटी 89 लाख तर उमरी तालुक्यासाठी 27 हजार 37 शेतकर्यांना 12 कोटी 50 लाख असा एकुण 391 कोटी 17 लाख रुपयांचा सोयाबीन पिकांचा पिक विमा मंजूर करण्यात आला आहे.अशी माहिती शेतकरी पुञ संघर्ष समितीचे बालाजी पाटील ढोसणे, बालाजी पाटील सांगवीकर, गजानन पाटील होटाळकर, अनिल पा दापके, अंकुश पा कोल्हे यांनी दिली.
हि पिकविम्याची मंजुर रक्कम केंद्र शासनाचा हिस्सा नं मिळाल्यामुळे दिवाळीपुर्व पडली नसल्याने शेतकर्यांची दिवाळी अंधारमय होत असुन या गोष्टीचा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांनी जर केंद्राचा अडकुन असलेला हिस्सा दिवाळीपुर्व खेचुन पिकविमा कंपनीला वाटप करायला भाग पाडला असता तर शेतकरी पुञ संघर्ष समिती त्यांना श्रेय दिलो असतो पण ऐनवेळी येवुन श्रेय घेण्याची लोकप्रतिनिधीत श्रेय घेण्याचा खटाटोप असल्याचा घणाघात शेतकरी पुञ संघर्ष समितीने केला आहे.