नांदेड। कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी दील्ली येथे मोहसिना किडवई यांच्या पुस्तक प्रकाशन समारंभात बोलतांना जिहाद हा केवळ कुराणातच आहे असे नाही तर महाभारतातही आहे.भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला युध्द करण्यासाठी जो उपदेश केला हा जिहादच होता असे निचपातळीवरील वक्तव्य करुन हिंदू धर्मासाठी पवित्र असलेल्या भगवतगितेचा अपमान केला आहे.विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांत या वक्तव्याचा निषेध करीत असून, चाकूरकरांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी करीत आहे.
शिवराज पाटील यांना त्यांच्या राजकिय कारकीर्दीत भरपूर अधिकार मिळाले पण एकही विधायक कार्य यांनी केले नाही.आयुष्यभर त्यांनी गांधी -खान घराण्यांची चाटुगीरी केली.चाटुगीरी करता करता यांचा डि.एन.ए हलालमय व जिहादमय झाला त्यामुळे चाकुरकरांना प्रत्येक बाबीत जिहाद दिसतोय.भगवा दहशतवाद या शब्दाच्या उत्पत्तीचा जनकही शिवराज पाटीलच आहेत.
देशाचे गृहमंत्री असतांना IAS IPS अधिका-यांच्या ट्रेनिंग मध्ये प्रशिक्षण देण्यासाठी जिहादी झाकीर नाईकला यांनीच निमंत्रित केले होते. यावरुन शिवराज पाटलांची जिहादी मानसिकता निदर्शनास येते. मुंबईमध्ये बॉम्बस्फोटाची मालीका चालू असतांना शिवराज पाटील प्रत्येकवेळी वेगवेगळे ड्रेस घालून माध्यमासमोर येत होते हे त्यावेळच्या वृत्तवाहीण्यांनी दाखवून दीले आहे.
मुळात देशाच्या संविधानात कोणत्याही धर्माच्या देवीदेवतांचा अपमान हा दखलपात्र गुन्हा मानला जातो.शिवराज पाटलांनी तर हिंदू धर्माचा पवित्र धर्मग्रंथ भगवतगितेचा अपमान केलेला आहे.ऐन दिपावलीत गितेचा अपमान करणाऱ्या नरकासुर रुपी मानसिकता असणाऱ्या शिवराज पाटील चाकूरकरांचा तीव्र धिक्कार करुन त्यांच्यावर अत्यंत कठोर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, मातृशक्ती, दुर्गा वाहिनी नांदेड तर्फे महामहिम राष्ट्रपतीजीना करण्यात आली.