स्थागुशाच्या पथकाने एका दरोडेखोरास पळून जाताना गोळीबार करून पकडले एक फरार झाला
नांदेड/उमरी| जिल्ह्यातील उमरी तालुक्यात असलेल्या मौजे सिंधी येथील कै. व्यंकटराव पाटील कवळे बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या शाखेत दि.०१ ऑकटोबर रोजी भर दुपारी कर्मचाऱ्यांवर तलवारी उगारून सहा दरोडेखोरांनी ३ लाखाहून अधिकची रक्कम पळवली आहे. दरम्यान, एका दरोडेखोराला पतसंस्थेच्या कर्मचाऱ्याने पाठलाग करून पकडले आणि बेदम चोप दिला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील सिंधी काँग्रेसचे कावळे गुरुजी यांची कै. व्यंकटराव पाटील कवळे बिगर शेती सहकारी पतसंस्था आहे. या संस्थेत नेहमीप्रमाणे काम सुरु असताना दुपारी २ वाजेच्या सुमारास दोन दुचाकीवरून आलेले ६ दरोडेखोर अचानक पतसंस्थेच्या ऑफिसमध्ये घुसले. आणि हातातील तलवारी बाहेर काढून कर्मचाऱ्यावर उगारल्या. कॅशियरच्या गळ्याला तलवार लावून तीन लाख रुपये दरोडेखोरांनी लांबवले. हि सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, दिवसाढवळ्या घडलेल्या या लुटीच्या घटनेने नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे. जमावाने एका आरोपीला पकडून बेदम मारहाण केली आहे, सध्या त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
त्यानंतर या दरोडेखोराचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने एक पथक तैनात केले होते त्या पथकाने रात्री ग्रस्त करत असताना परत पुणेगावाकडून येत असताना एका दुचाकीला थांबविण्याचा प्रयत्न स्थागुशाच्या पथकाने केला, त्यांनी न थांबता पोलिसांवर हल्ला केला, यात एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला परंतु एकाला पोलिसांनी गोळीबार करून पकडले आहे एकूणच पतसंस्थेवर दरोडा टाकून लुटलेली रक्कम घेऊन पसार होऊ पाहणाऱ्या चोरट्यापैकी एकाला पकडल्यामुळे आता या चोरीच्या घटनेचा तपासाला गती मिळणार आहे.
दरोडेखोराला चोप -दरोडेखोर पसार होण्यासाठी दुचाकीवर बसून गाडी काढताच पाठीमागून एका कर्मचाऱ्याने दरोडेखोराच्या डोक्यात दगड फेकून मारला. हा दगड मारताच दरोडेखोरांची गाडी खाली पडून एक दरोडेखोरही खाली कोसळला. कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून त्यास पकडले आणि बेदम चोप दिला. हा प्रकार पाहून बाकीचे दरोडेखोर येथून पसार झाले.