लोहा| स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संपन्न झालेल्या लोहा तालुकास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत जि.प.कें.प्रा.शा. सुनेगाव या शाळेचे विद्यार्थी कु.आकांक्षा बजरंग जाधव कु.संध्या संदीप जाधव आणि मुक्तेश्वर गोविंद जाधव या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावून भव्य यश संपादन केले.
जिल्हा प्रशासन नांदेड च्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तालुकास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केली होती. ही स्पर्धा जि.प.प्रा.शा.पारडी येथे संपन्न झाली. तीन फेऱ्यांमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत तालुक्यातील 13 संकुलातील 13 शाळांचा सहभाग होता.
ही स्पर्धा तीन फेऱ्यांमध्ये पार पडली 3 फेऱ्यांमधील सर्वच्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन 25 पैकी 24 गुण संपादन करत जि.प. कें.प्रा. शाळा सुनेगावच्या विद्यार्थ्यांनी लोहा तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी श्री रवींद्र सोनटक्के शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती सरस्वती आंबलवाड,केंद्रप्रमुख श्री मदन नायके मुख्याध्यापक श्री चंपतराव सावळे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बजरंग जाधव उपाध्यक्ष संदीप जाधव यांच्यासह अनेकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
स्पर्धेमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री काशिनाथ शिरसीकर, पदवीधर शिक्षक लहू पंदलवाड,तंत्रस्नेही शिक्षक मुर्तुजा सय्यद ,भुजंग वाघमारे गुलाब घोडके वामन पवार सौ प्रतिभा कुलकर्णी व सौ निशा भंडारे यांनी मार्गदर्शन केले. प्रस्तुत शाळेचा मागील महिन्यामध्ये संपन्न झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात देखील प्रथम क्रमांक आलेला होता. या यशा नंतर सुनेगागावच्या शाळेला दुहेरी विजयाचा मान मिळाला आहे. त्यामुळे शाळेचे पंचक्रोशीत आणि तालुक्यांमध्ये नावलौकिक झाले आहे.ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेमध्ये देखील अतिशय दर्जेदार असे शिक्षण चालते हे या निमित्ताने सिद्ध झाले आहे.