नविन नांदेड। सिडको व हडको परिसरातील नवरात्र महोत्सव निमित्ताने आयोजित ब्रम्होत्त्सव काळातील नवमी निमित्ताने दोन्ही मंदिर देवस्थानच्या चा वतीने भगवान बालाजी मुर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या सह अनेक भाविक भक्तांनी मिरवणूक मार्गावर रांगोळी, फटाक्यांच्यी आतिषबाजी करत विधीवत पूजा करून दर्शन घेतले.
ब्रमोहोत्त्सव निमित्ताने हडको व सिडको येथील श्री भगवान बालाजी मंदिर देवस्थान येथे २६सप्टेबंर ते ४ आकटोबर पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, हडको परिसरातील भगवान बालाजी मंदिर देवस्थान येथे ४ आकटोबर रोजी सायंकाळी सात वाजता नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या हस्ते भगवान बालाजी मुर्ती पालखी सोहळा मिरवणुक काढण्यात आली. यावेळी महिला पुरुष व भाविक भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी परिसरातील मुख्य मार्गावर अनेक भाविक भक्तांनी रांगोळी फटाक्यांच्यी आतिषबाजी व फुलांची पुष्पवृष्टी करून या मिरवणुकीचे स्वागत केले व विधीवत पूजा केली, विश्वस्त मंडळ समितीचे अध्यक्ष अरुण दमकोडंवार, उपाध्यक्ष विश्वनाथ देशमुख, बाबुराव येरगेवार,बि.आर, मोरे, प्रकाशसिंग परदेशी,दिलीप कदम यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते.
सिडको परिसरातील भगवान बालाजी मंदिर देवस्थान येथे विश्वस्त मंडळ पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पालखी मिरवणूक मुख्य मार्गावर काढण्यात आली यावेळी ढोलताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजी मध्ये व भाविकांनी केलेल्या पुष्पवृष्टी मध्ये स्वागत करण्यात आले.सिडको भागातील अनेक भागात उत्साहात पालखी मिरवणूक स्वागत करून आरती ओवाळून विधीवत पूजा केली. यावेळी विश्वस्त मंडळ पदाधिकारी साहेबराव जाधव,आंनदराव बासटवार हाडोळे, बिरादार, यांच्या सह विश्वस्त मंडळ पदाधिकारी व पुरोहित यांच्यी ऊपसिथीती होती. ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.