आई-वडिलांच्या स्मृती जागृतीसाठी निराधारांना अन्नदानाचे पवित्र कार्य
उस्माननगर, माणिक भिसे। भारतीय संस्कृतीत दान करणे हे पवित्र समजले जाते अशाच एका माजलगाव जि.बीड येथील श्री.डाॅक्टर खोडसकर परिवारातील कुटुंबाने आपल्या आई वडिलांच्या स्मृती सदैव कायम स्मरणात ठेवण्यासाठी सामाजिक बांधिलकी जोपासत माजलगाव येथील वृद्धाश्रमातील अनाथांची व निराधारांसाठी अन्नदानाचे पवित्र कार्य केल्याचे परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
माजलगावचा डॉक्टर खोडसकर परिवाराचा प्रेरणादायी उपक्रम
माजलगाव आपल्या आई-वडिलांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी सामाजिक बांधिलकी जोपासत परंपरागत कर्मकांडांना फाटा देत वृद्धाश्रमातील अनाथांची सेवा करण्याचा अनुकरणीय उपक्रम माजलगाव येथील प्रतिथयश डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर प्रकाश देशमुख खोडसकर यांच्या सुविद्य पत्नी सौ ज्योती प्रकाश देशमुख खोडसकर यांनी राबवला असून त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत आणि कौतुक करण्यात येत आहे.
सामाजिक कार्यात नेहमीच शीर्षस्थानी असलेले माजलगाव येथील निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रकाश देशमुख खोडसकर यांच्या प्रेरणेतून त्यांच्या पत्नी सौ ज्योती देशमुख यांनी दिनांक 1 ऑक्टोबर रोजी पाथरी तालुक्यातील ओमकार वृद्धाश्रमातील 50 स्त्री पुरुष निराधार वृद्धांना एक दिवसाचे भोजन आणि आश्रमात लागणारे नित्य उपयोगी साहित्य देऊन आपल्या आई-वडिलांच्या स्मृती जागृत ठेवण्याच्या यशस्वी प्रयत्न केला. वृद्धाश्रमातील अनाथवृद्धांमध्ये आपल्या आई-वडिलांना पाहणाऱ्या सौ ज्योती प्रकाशराव देशमुख खोडसकर यांचा हा उपक्रम समाजाच्या अन्य घटकांसाठी एक प्रेरणा संस्कृत ठरणारा असल्याची प्रतिक्रिया ओमकार वृद्धाश्रमाचे संस्थापक संचालक डॉक्टर जगदीश शिंदे यांनी दिली.
डॉक्टर प्रकाश देशमुख खोडसकर हे सामाजिक कामात नेहमीच शीर्ष स्थानी असतात सेवानिवृत्तीनंतर त्यांनी आपल्या आई-वडिलांच्या स्मृती कायम तेवत ठेवता यावात. या उद्देशाने काय विठ्ठलराव खोडसकर गुरुजी स्मृती प्रतिष्ठानची स्थापना केली असून या संस्थेअंतर्गत माजलगाव येथे रुग्णालय सुरू केले आहे. अगदीच अल्प दरात रुग्णसेवा देणारे डॉक्टर प्रकाश खोडसकर आठवड्यातील एक दिवस सर सोमवारी या रुग्णालयामार्फत मोफत रुग्ण सेवा करतात आतापर्यंत वीस हजार पेक्षा अधिक रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला असून, त्या मार्गाने आज जीवन आपण सामाजिक उत्थानासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे डॉक्टर खोडसकर यांनी सांगितले.
डॉक्टर प्रकाशराव खोडसकर यांच्या पत्नी सौ ज्योती पुरस्कार यादेखील त्यांच्या खांद्याला खांदा लावून सामाजिक उन्नतीसाठी नेहमी प्रयत्नशील असतात. डॉक्टर खोडसकर पती-पत्नीची सामाजिक क्षेत्रातले वाटचाल यशस्वी करण्यासाठी त्यांचे चिरंजीव दीप आणि पराग यांचे विशेष प्रयत्न असल्याचे प्रकार प्रकार सेना दिसून येते एकूणच डॉक्टर खोडसकर परिवाराचा सामाजिक क्षेत्रातील कामाचा वाटा लक्षणीय असल्याचे सांगत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. पाथरी येथील ओमकार वृद्धाश्रमा दिनांक 1 ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या निराधार वृद्धांसाठी अन्नदान उपक्रमास माजलगाव येथील जलमित्र प्रभाकर शेटे ज्ञानोबा भोसले परमेश्वर लांडगे यांची उपस्थिती होती. हा स्मृतीसहळा यशस्वी करण्यासाठी पराग खोडसकर यांनी विशेष परिश्रम घेतले. ओमकार वृद्धाश्रमाचा व्यवस्थापक सौ गीतासोगे यांनी डॉक्टर खोडसकर परिवाराचे आभार मानले तर आश्रमातील सर्व निराधार वृद्ध मंडळींनी डॉक्टर खोडसकर परिवाराला भरभरून आशीर्वाद दिला.