मुंबई मराठी साहित्य संघाकडून इसाप प्रकाशनास वि. पु. भागवत प्रकाशन पुरस्कार प्रदान -NNL


नांदेड|
मुंबई मराठी साहित्य संघाचा मराठी भाषा प्रकाशन क्षेत्रातील अत्यंत मानाचा असा 'वि. पु. भागवत प्रकाशन पुरस्कार - २०२२' नांदेड येथील इसाप प्रकाशनास समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.

मुंबई येथील डॉ. अ. ना. भालेराव सभागृहात दि. २९ ऑक्टोबर २०२२ रोजी श्रीमती अचला जोशी यांच्या अध्यक्षतेखाली व अ. भा. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी प्रतिभा विश्वास यांनी इसाप प्रकाशनास देण्यात येणाऱ्या मानपत्राचे वाचन केले. यानंतर पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या शुभहस्ते इसाप प्रकाशनाचे संचालक दत्ता डांगे यांना सन्मानचिन्ह, मानपत्र व पाच हजार रुपये देऊन गौरव करण्यात आला!

याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना हा अत्यंत मानाचा पुरस्कार मी शेतात उन्हातान्हात, पावसापाण्यात अविरत कष्ट करणाऱ्या शेतमजूर आणि शेतकरी यांना अर्पण करीत आहे. या पुरस्काराची रक्कम त्यांना देण्यात येईल अशी भावना व्यक्त केली. तसेच शेतकऱ्याने रखरखत्या उन्हात हाणलेल्या एका ओळीची बरोबरी लेखकांच्या एक लाख ओळीही करू शकत नाहीत म्हणून त्यांच्या कष्टाची जाण ठेवीत हा पुरस्कार त्यांना अर्पण करीत असल्याचे म्हटले. यावेळी पुरस्कार विजेत्यांची भाषणे झाली. 

पद्मविभूषण डॉ. काकोडकर यांनी व अध्यक्षा अचला जोशी यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी अशोक बेंडखळे, नारायण लाळे, एकनाथ आव्हाड, सदानंद पुंडपाळ, विजयकुमार चित्तरवाड, मोनिका गजेंद्रगडकर आदी नामवंत साहित्यिक व साहित्य रसिक उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी