लोह्याचे भूमिपुत्र डॉ दिनेश चव्हाण यांनी दुबईत केली दंत शस्त्रक्रिया..NNL


लोहा|
विदेशातील डॉक्टर आपल्या भागात येऊन रुग्णांवर उपचार करतात. त्यामुळे आपणास रुग्ण बरा होणारच असा आत्मविश्वास वाटतो. पण आपल्या भागातील डॉक्टर सुद्धा विदेशात जाऊन ररुग्णांवर उपचार करतात हे आपल्या साठी अभिमानाची बाब होय. माजी सभापती कै व्यंकटराव मुकदम यांचे नातू लोह्याचे भूमिपुत्र डॉ दिनेश माणिकराव मुकदम चव्हाण यांनी दुबई जाऊन रुग्णांवर दंत शस्त्रक्रिया केली.

दंत शल्य चिकित्सक डॉ. दिनेश माणिकराव चव्हाण (मुकदम ) यांनी  जर्मनी मध्ये जाऊन दंत विषयक आधुनिक अभ्यास केला आहे. दाताचे प्रत्यारोपण अतिशय सुलभतेने ते करतात. दुबई येथील प्राईम मेडिकल हेल्थ सेंटर येथे कन्सल्टंट इमप्लॅनटॉलॉजिस्टसाठी ते गेले त्यांनी डिजिटल आणि रोबोटिक्स इमप्लॅन्ट सर्जरी यशस्वी पणे पार पडली. यासाठी भारतातून खूप कमी सर्जन यासाठी बोलवण्यात येतात त्यात डॉ दिनेश चव्हाण यांना बोलावले व त्यांनी यशस्वीपणे पार पडली विदेशात असा प्रकारची शस्त्रक्रिया आपल्या भूमिपुत्रांनी केली त्याबद्दल डॉ दिनेश यांचे अभिनंदन होत आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी