लोहा| लोहा शहरातील साई गोल्डन सिटी येथे दुर्गासाई नवराञ मंडळाअंतर्गत महिलांसाठी आरोग्य शिबीर घेण्यात आले. माता सुरक्षित तर घर सुरक्षित या कार्यक्रमाअंतर्गत सर्व महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
महिला आरोग्य शिबिरासाठी ग्रामीण रुग्णालयातिला डॉ सरकार मॅडम, डॉ दीपक मोटे, आयोजक मुख्याध्यापक दामोदर वडजे,डॉ रब्बी सय्यद मॅडम, भाग्यश्री पेनलोड मॅडम, गंगासागर गजवाड, मोरे, अशोकवाड, एस.डी.वडवळे, बी.पी. डोळस मॅडम, डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी सर्व महिलांची तपासणी केली व निदान केले यात रक्तगट,थाॕयराईड, बी.पी.,शुगर, RBC,WBC, क्षयरोग, दंतरोग, अल्सर, मलेरीया, कैन्सर, एचबी टेस्ट करण्यात आली रोगांची माहिती देण्यात आली व मोफत उपचार केले.
यावर्षी प्रथमच साई गोल्डन सिटीमध्ये दुर्गा देवीची स्थापना करण्यात असुन मोठ्या उत्साहाने अवांतर खर्च न करता अनेक समाज प्रबोधनाच्या कार्यक्रमाची आखणी व योग्य नियोजन मंडळाने केले आहे. या कार्यक्रमासाठी शुभम जोशी,शुभम वडजे , ऋषिकेश निलेवाड, सौ.शोभा जोशी,सौ.मंगल वडजे ,सौ.गीता डोम,सौ.महानंदा निलेवाड,सौ.मणकर्णा मोरतळे,सौ.गंगासागर बेद्रे,सौ.अरुणा बोरुळे यांनी विशेष परीश्रम घेतले आहेत.