लोहा| जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निळा येथील उपक्रमशील शिक्षक विशाल मेघाजी महाबळे याना डॉ. शंकरराव चव्हाण ज्ञानरत्न शिक्षक पुरस्कार देऊन सुनेगाव संकुल स्तरीय शिक्षण परिषदेत सन्मानित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षक काँग्रेस वतीने दिला तालुकास्तरीय डॉ. शंकररावजी चव्हाण ज्ञानरत्न शिक्षक पुरस्कार दिले जात आहेत. सुनेगाव संकुलातील शिक्षण परिषद प्रशाला भाद्रा येथे पार पडली. विशाल महाबळे यांना आमदार मोहनअण्णा हंबर्डे , माजी आमदार रोहिदास चव्हाण यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमासाठी माजी, सभापती खुशाल पाटील, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य श्रीनिवास मोरे, गटशिक्षणधिकारी रवींद्र सोनटक्के, नगरसेवक प्रतिनिधी संभाजी पाटील चव्हाण, शिक्षण विस्तार अधिकारी आंबटवाड मॅडम, आयोजक शिक्षक काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष विठ्ठल चव्हाण यासह केंद्रातील शाळांचे शिक्षक मुख्याध्यापक उपस्थित होते.
विशाल महाबळे हे आपल्या शाळेत विविध उपक्रम राबवित असतात.विद्यार्थी व शाळा प्रिय शिक्षक म्हणून ते ओळखले जातात. पदवीधर आणि इंग्रजी गणित विषयाचे तज्ज्ञ शिक्षकम्हणून तालुक्यात परिचित आहेत यापूर्वी पंचायत समितीच्या वतीने तालुका स्तरीय गुरू गौरव पुरस्कार देऊन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते त्याचा गौरव करण्यात आला. आई बेबीताई, वडील मेघाजी महाबळे , आत्या यांच्या उपस्थिती शिक्षक विशाल महाबळे याना डॉ शंकरराव चव्हाण ज्ञान रत्न शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. शिक्षक नेते विठ्ठल चव्हाण व सहकार्यांनी हा पुरस्कार सोहळा आयोजित केला होता.