दिवाळीनिमित्त विविध योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारकांना शिधाजिन्नस ऑक्टोबर महिन्यात वितरित होईल याची दक्षता घ्या -तहसीलदार डॉ मृणाल जाधव -NNL


किनवट, माधव सूर्यवंशी|
तालुक्यातील अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब योजना व एपीएल केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना आगामी दिवाळी सणानिमित्त  प्रत्येकी १ किलो रवा, १ किलो  चणादाळ, १ किलो साखर, १ लिटर पामतेल असलेल्या शिधाजिन्नस संच उपलब्ध करुन देण्याचा व कंत्राटदारां मार्फत शिधाजिन्नस संच संबंधित तालुका गोदामापर्यंत पोहचविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.सर्व शिधाजिन्नस संच हे दिवाळी सणानिमित्त देय असल्याने माहे ऑक्टोबर महिन्यामध्ये  (दिवाळी सणापूर्वी) ईपॉस मशीनद्वारे वितरीत होतील याची दक्षता घेण्याचे निर्देश तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांनी आज(ता.१२) तहसील कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या रास्त भाव दुकानदारांच्या बैठकीत दिले आहेत. 

कोणतेही संच सुटे करुन गोदामातून स्वस्त धान्य दुकानदारास व दुकानदारांमार्फत लाभार्थ्यांना वितरीत होणार नाही याची खबरदारी घ्यावी. सदर (१ किलो रवा,१ किलो साखर, १ किलो चणादाळ, १ लिटर पामतेल) संच प्रति रुपये १०० या दराने विक्री करावयाचे आहेत.  शिधाजिन्नस संच वितरीत करण्याकरीता  शासन निर्णयानुसार तरतुदीनुसार प्राप्त क्विंटल १५० रुपये प्रमाणे (प्रतिसंच ६ रु प्रमाणे) रास्तभाव दुकानदारांना मार्जीन देय राहील. सर्व शिधाजिन्नस संच हे दिवाळी सणानिमित्त देय असल्याने माहे ऑक्टोबर महिन्यामध्ये  (दिवाळी सणापूर्वी) ईपॉस मशीनद्वारे वितरीत होतील याची दक्षता घ्या, असे आवाहनही याप्रसंगी बोलताना डॉ.मृणाल जाधव यांनी केले.   

मंचावर नायब तहसीलदार (पुरवठा)महंमद रफिक,पुरवठा निरीक्षक श्री.सरनाईक, विनोद सोनकांबळे व रास्त भाव दुकानदार संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय गड्डमवार, उपाध्यक्ष म.जावेद चव्हाण ,रामलु तिरनगरवार यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी प्रविण आयनेल्लिवार, पांडूरंग राठोड, सिद्धार्थ मुनेश्वर,संजिव भवरे, सुरेश पाटील,संजय राठोड, सत्यनारायण सुंकरवार,अशोक कन्नमवार,दत्ता दोनकेवार, उद्धव आडे,शफी चव्हाण व कायदेशीर सल्लागार अड.मिलिंद सर्पे यांच्यासह मोठ्या संख्येने रास्त भाव दुकानदार उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी