अर्धापूर, निळकंठ मदने| शिख समाजाचे धर्मगुरु श्री गुरुगोविंद सिंघ यांनी खालसा (शिख) ला ढाल - तलवार निशाणी दिलेली आहे, त्यामुळे निवडणूक आयोगाने कुठल्याही पक्षाला शीख समाजाची निशाणी देऊ नये, त्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या जातात, त्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला दिलेले ढाल - तलवार हे चिन्ह गोठून त्या पक्षाला दुसऱे चिन्ह द्यावे, अन्यथा या गंभीर विषयी आंदोलन करण्यात येणार असल्याचे शिख समाजाने निवडणूक आयोगाला निवेदन दिले आहे,अशी माहिती गुरुद्वारा बोर्डाचे माजी सचिव रणजितसिंह कामठेकर यांनी सांगितले.
निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला नुकतेच ढाल-तलवार चिन्ह दिले, पण शिख समाजाचे धर्मगुरु श्री गुरुगोंविंद सिंघजी यांनी शीख समामाजा खालसा (पंत्राकर) समाजाला ढाल-तलवार निशाणी दिलेली असल्याने यामुळे शीख समाज ढाल-तलवार या निशाणीला धार्मिक भावनेतून अफाट श्रध्दा करतो,पण निवडणूक आयोगाने राजकारणात ही निशाणी एका राजकीय पक्षाला निवडणूक चिन्ह म्हणून ढाल- तलवार हे चिन्ह दिले.
त्यामुळे शिख समाजाचे धार्मिक दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाचे ढाल-तलवार असलेली निशाणी दिल्याने देशभरातील शिख समाजामध्ये असंतोष निर्माण झाला आहे, नांदेड येथील श्री गुरुगोंविंद सिंहजी यांच्या नांदेड शहरातील गुरुद्वारा बोर्डाचे माजी सचिव तथा कामठ्याचे उपसरपंच रणजितसिंह कामठेकर यांनी समाजबांधवासह निवडणूक आयोगाला स्वाक्षरीसह निवेदन दिले आहे.