नांदेड| दिवाळी दरम्यान होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून
अनु क्र. | गाडी क्र. | कुठून – कुठे | प्रस्थान | आगमन | दिवस | दिनांक |
1 | 07409 | नांदेड – हडपसर (पुणे) | 20.50 | 09.00 | बुधवार | 26 ऑक्टोबर-2022 |
07410 | हडपसर (पुणे) - नांदेड | 15.30 | 04.00 | गुरुवार | 27 ऑक्टोबर-2022 |
1 ) नांदेड ते हडपसर (पुणे) विशेष मार्गे परळी-लातूर : गाडी क्रमांक 07409 हि गाडी हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावरून दिनांक 26 ऑक्टोबर, 2022 रोजी बुधवारी रात्री 20.50 वाजता सुटेल आणि पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी, घाटनांदूर, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, कुर्डूवाडी, दौंड मार्गे हडपसर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 09.00 वाजता पोहोचेल.
हडपसर (पुणे) ते नांदेड हि विशेष मार्गे लातूर-परळी : परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 07410 हि गाडी हडपसर रेल्वे स्थानकावरून दिनांक 27 ऑक्टोबर, 2022 रोजी गुरुवारी दुपारी 15.30 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच हुजूर साहिब नांदेड येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 04.00 वाजता पोहोचेल. या गाडीत 22 डब्बे असतील. गाडीचे वेळापत्रक सोबत जोडले आहे.
2. या कार्यालयाने दिनांक 21 ऑक्टोंबर, 2022 रोजी दिलेल्या प्रेस नोट क्र. 309 नुसार गाडी क्रमांक 07405 हि गाडी हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावरून दिनांक 25 ऑक्टोबर, 2022 रोजी मंगळवारी सायंकाळी 17.40 वाजता सुटेल आणि पूर्णा, परभणी, सेलू, परतूर, जालना, औरंगाबाद, अंकाई, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड कोर्ड लाईन मार्गे हडपसर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 07.10 वाजता पोहोचेल.
तसेच परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 07406 हि गाडी हडपसर रेल्वे स्थानकावरून दिनांक 26 ऑक्टोबर, 2022 रोजी बुधवारी दुपारी 15.10 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच हुजूर साहिब नांदेड येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 04.30 वाजता पोहोचेल. या गाडीत 19 डब्बे असतील. गाडीचे वेळापत्रक सोबत जोडले आहे.
या कार्यालयाने दिनांक 20 ऑक्टोंबर, 2022 रोजी दिलेल्या प्रेस नोट क्र. 308 नुसार गाडी क्र. 07403/07404 नांदेड-हडपसर-नांदेड हि एक विशेष गाडी परभणी, परळी, लातूर मार्गे धावेल. हि गाडी नांदेड येथून 23 ऑक्टोबर आणि हडपसर येथून 24 ओक्टोबर रोजी सुटेल. या गाडीत 22 डब्बे असतील.