विज बिल वसुली प्रमाणे सुरळीत वीज पुरवठा देण्याकडे होते दुर्लक्ष
हिमायतनगर,अनिल मादसवार। शहर व परिसरात महावितरण कार्यालयात नेहमीच अनुपस्थित राहणाऱ्या अभियंतामुळे ऐन दिवाळीच्या पर्वकाळामध्ये नागरिकांना विजेचा लपंडावाचा सामना करावा लागत आहे सध्या दिवाळीपूर्व सुरू असताना सकाळी आणि सायंकाळी घराघरात वीज पुरवठा सुरळीत होणे आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी महावितरण कंपनीने सुरळीत वीज पुरवठा देणे आवश्यक आहे. असे असतानाही हिमायतनगर येथील अभियंत्याचा नाकर्तेपणा सर्वसामान्य नागरिकांना अडचणीचा ठरतो आहे.
हिमायतनगर शहरात कार्यरत असलेल्या महावितरण कार्यालयातील जबाबदार अधिकारी कार्यालयात कमी आणि बाहेर जास्त फिरत असल्यामुळे कामांमध्ये येणाऱ्या नागरिकांना माघारी फिरावे लागत असल्याचे चित्र मागील चार दिवसापासून पहावयास मिळते आहे. याबाबत नांदेड न्यूज लाईव्हने वृत्त प्रकाशित करून महावितरण कार्यालयात चालत असलेल्या खेळ खंडोबा चव्हाट्यावर आणला होता. त्यानंतरही अधिकाऱ्याच्या कामकाजात कसलीही सुधारणा झाली नसल्याचे दिवाळीच्या अभ्यंगस्नानाच्या वेळी दहा ते पंधरा वेळा वीज गुल झालेल्या प्रकारावरून दिसून येत आहे. येथे कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यावर उपकार्यकारी अभियंता यांची वचक नसल्यामुळे देखील येथील अधिकारी मनमानी पद्धतीने काम करताना दिसून येत आहेत नागरिकांना सुरळीत सेवा देण्यात कमी तर स्वार्थी पद्धतीच्या कामाकडे जास्त लक्ष दिले जात असल्याचा आरोप गेल्या अनेक वर्षापासून विजेच्या कनेक्शनसाठी प्रस्ताव दाखल केलेल्या नागरिकांनी केला आहे. एवढेच नाही तर शहर व तालुका परिसरात वीज पुरवठ्याच्या दुरुस्तीच्या कामातही ठेकेदाराशी मिलीभगत करून बोगस पद्धतीने कामे करण्याचा सपाटा सुरू आहे त्यामुळे दरवर्षी महावितरण कंपनीला दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपयांचा फटका बसत असून वीज पुरवठा मात्र सुरळीत होत नसल्याने करण्यात आलेल्या दुरुस्तीच्या कामातील झालेले हेराफेरी यास कारणीभूत ठरते आहे.
एकूणच हे सर्व प्रकार पाहता मागील अनेक वर्षापासून येथील कार्यालयात ठाण मांडून बसलेल्या अभियंत्यांची उचल बांगडी करावी आणि हिमायतनगर शहरातील नागरिकांना सुरळीत बीज पुरवठ्याची व्यवस्था व्हावी यासाठी कर्तव्यदक्ष अभियंत्याचे नेमणूक करून होणाऱ्या बीज चोरीवर आळा घालावा, कारण इतर ठिकाणी अभियंत्याच्या संगमने होत असलेल्या वीज चोरीचा फटका सर्वसामान्य ग्राहकाच्या माथी मारल्या जात असल्याने वीज ग्राहकांना आर्थिक भूदंड सोसावा लागतो आहे. त्यातच रीडिंग घेणार ठेकेदाराचाही मनमानी कारभार कारणीभूत असून अव्वाच्या सव्वा दाराने वीज देयके आकारून ग्राहकना आर्थिक भुर्दंड देण्याचा प्रकार सुरू केला जातो आहे.
जास्तीचे बिल आल्यानंतर ग्राहक अभियंता कार्यालयात जाऊन याबाबतचे विचारना करतात मात्र आलेले बिल भरावे लागेल असा दम अधिकार्याकडून वीज ग्राहकाला दिला जातो. त्यामुळे नाईलाजाने वीज ग्राहकांना आलेले बिल भरून आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. विज देयके भरूनही सुरळीत वीजपुरवठा दिला जात नसल्याने सण उत्सवाच्या काळात नागरिकांच्या आनंदावर विर्जन पडते आहे. या सर्व प्रकाराकडे जबाबदार असलेल्या आणि शासनाकडून झालेल्या पगार घेणाऱ्या अभियंत्याचे दुर्लक्ष होत असल्यामुळे वीज ग्राहकांना आर्थिक भुर्दंड बसतो आहे. अशा स्वार्थी आणि निष्क्रिय अभियंत्याची तातडीने उचल बांगडी करावी अशी मागणी नियमित पुणे देयके भरणाऱ्या वीज ग्राहकातून केली जात आहे.
हीमायतनगर शहर हे तालुक्याचे ठिकाण असून, या ठिकाणी असलेल्या उपकार्यकारी अभियंता कार्यालयात शहर आणि ग्रामीण अभियंताचे सुद्धा कार्यालय स्थापित आहे या कार्यालयाचे दिवसभर दार उघडे असतात मात्र संबंधित अभियंते कार्यालयात दिसून येत नाहीत यावरूनच अधिकारी आपल्या कर्तव्याबाबत किती तत्पर आहेत हे दिसून येत आहे एकीकडे वीज बिल वसुलीच्या तगादा तर दुसरीकडे सुरळीत वीजपुरवठा देण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे मागील काळात झालेल्या सन उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी ही बाब राजकीय नेत्यांच्या लक्षात आणून दिली. त्यावेळी आमदार जवळगावकर यांनी विज पुरवठा बाबत हलकर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही अशा सूचनाही देऊन दोन्ही अभियंत्यांना चांगलेच खडसावले होते. तरी देखील यांच्या कामात कोणतीही सुधारणा झाली नसल्याचे सुरू असलेल्या भोंगळ कारभारावरून दिसून येत आहे. किमान सण उत्सवाच्या काळात तरी सुरळीत आणि सुरक्षित वीज पुरवठा देऊन ग्राहकांची सहानुभूती अभियंत्यांनी मिळवावी अन्यथा नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागेल अशा संताप जन्म भाव नाही अनेक वीज ग्राहकांनी बोलून दाखविले आहेत.