संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या हस्ते संपन्न
मुखेड, रणजित जामखेडकर। मुखेड तालुक्यातील बावलगाव येथे दिव्यांग, वृद्ध ,निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र या शाखेच्या बोर्डाचे अनावरण संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलिकर, यांच्या हस्ते करण्यात आले. गावकऱ्याच्या वतीने प्रमुख पाहुण्याचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
सुत्रसंचलन हंनमत ताटे यांनी केले. प्रस्ताविक ता. ऊपअध्यक्ष बालाजी गवाले यांनी बोर्डाचे अनावरण का करण्यात आले त्यांचे महत्व सांगताना शेतकऱ्याच्या शेतातील पिकाची शेजऱ्याचे नुकसान होऊ नये म्हणुन शेतकरी शेजऱ्यावर कपडा बांधुन ठेवतो ते कपडा फडकला तर जंगली प्राणी पिकाची नाश करत नाहि व चोरी होत नाहि.
म्हणुन दिव्यांग बांधवानी आपल्या दिव्यांग निधी ईतर निधीची चोरी होऊ नये म्हणुन आपला हक्काच्या सवलतीची माहिती दिव्यांग बांधवाना मिळावी म्हणुन संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल गाव तिथे शाखा स्थापन करुन दिव्यांगाना संघटितपणे संघटनेत सहभागी व्हावे असे अव्हान केले.
यावेळी जि.संपर्क प्रमुख नागोराव बंडे,गावातील सरपंच यांचे मनोगत व्यक्त केले. संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांनी दिव्यांग, वृद्ध ,निराधारांना मिळणाऱ्या शासकीय सवलतींची माहिती मिळावी म्हणून सोशल मिडीया व्हाटसअप्प, फेसबुक, युटुब वर चंपतराव डाकोरे व दिव्यांग मित्र मंडळ दोन्हि चॅनलवर माहिती घेऊन आपल्या हक्कासाठी जागे व्हा, घरी बसुन कांहि सवलती मिळत नसतात त्यासाठी ऊठ दिव्यांगा जागा हो संघर्षाचा धागा हो, शिका संघटित व्हा संघर्ष करून दिव्यांग होने का गम नहि हम किसेसे कम नहि हे दाखऊन द्या दिव्यांग वृध्द निराधारानी आपल्या हक्कासाठी संघटितपणे संघर्ष करून न्याय मिळावा म्हणुन दिव्यांग कायदा 2016 करून हक्क मिळत नसल्यामुळे गाव तिथे शाखेच्या बोर्ड करून आपली शक्ती निर्माण करून शासन प्रशासन यांना जागे करा असे अव्हाहन चंपतराव डाकोरे पाटिल यांनी केले.
या वेळेस दिव्यांग, वृद्ध, निराधार मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष चंपतराव पा. डाकोरे कुंचेलीकर जिल्हा संपर्कप्रमुख नागोराव पा. बंडे मुखेड ता ऊप अध्यक्ष बालाजी गवाले, सचिव हंनमत हेळगिरे, मानसिंग वडजे,नव्हारे,यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित सरपंच,पोलीस पाटील, उपसरपंच, तंटामुक्ती शाखा अध्यक्ष बालाजी गवाले,रामदास नरवाडे,दिंगाबर ताटे,योगेश गुंडे,रंजना ईबितदार,द्वारका तलवारे,रहेम शेख ईत्यादी मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य व गावातील नागरिक ही मोठ्या संख्येने उपस्थित होते . असे प्रसिध्दी पत्रक दिले