ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बक्षिसांची योजना करा - डॉ.हनुमंत मारोतीराव भोपाळे -NNL

नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या युवक महोत्सवामध्ये ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बक्षिसांची योजना कार्यान्वित करावी.

बहुतांशी पारितोषिके शहरी भागातील महाविद्यालय पटकावताना दिसतात .अनेक अडचणीवर मात करून ग्रामीण महाविद्यालयातील काही  विद्यार्थी सहभागी होतात; परंतु त्यांना पारितोषिके फारसे मिळत नाहीत. त्यामुळे बहुतांश विद्यार्थी युवक महोत्सवामध्ये सहभागी होण्यास उत्सुक नसतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बक्षिसांची योजना केली  तर नक्कीच ग्रामीण भागातील कलावंत विद्यार्थ्यांना न्याय मिळेल आणि अधिकाधिक विद्यार्थी युवक महोत्सवात सहभागी होण्यास मदत होईल. 

बेस्ट टीचर, बेस्ट प्रिन्सिपॉल आणि बेस्ट कॉलेज अवार्ड देताना ग्रामीण आणि शहरी अशा स्वतंत्र पुरस्कारांची योजना कार्यान्वित आहे .युवक महोत्सवातदेखील ग्रामीण आणि  शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बक्षिसांची योजना करावी. याशिवाय ज्या ज्या योजनेत किंवा स्पर्धेत विद्यापीठ पारितोषिके, पुरस्कार देते किंवा देणार आहे त्यातही ग्रामीण,आदिवासी आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाकडून स्वतंत्र पुरस्कार आणि बक्षिसांची योजना कार्यान्वित करावी अशी मागणी  सुप्रसिद्ध साहित्यिक तथा व्यक्तिमत्त्व विकासतज्ज्ञ डॉ. हनुमंत मारोतीराव भोपाळे यांनी कुलगुरू डॉ उध्दव भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. देशातील सर्व विद्यापीठांनी देखील अशाच पध्दतीने स्वतंत्र बक्षिसांची आणि पुरस्कारांची योजना केली पाहिजे असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी