हिमायतनगर। महाराष्ट्र शासनाने पटसंख्येच्या आधारावर जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा घेतलेल्या निर्णय हा गोरगरीब ग्रामीण भागातील जनतेच्या पाल्यांवर अन्याय करणार आहे. त्यामुळे हा निर्णय मागे घेण्यात यावा. अन्यथा गोरसेना संबंध महाराष्ट्रभर निषेधार्थ आंदोलन करेल असा इशारा गोर सेना संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
गोरसेनेच्या वतीने आज देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाने कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा घेतलेला निर्णय हा भारतीय संविधानाच्या मूलभूत अधिकारावर गदा आणणारा आहे महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयाचा गोर सेनेच्या वतीने निषेध करण्यात आला असून, या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात गोर सेनेच्या वतीने जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात येणार आहे आंदोलनाचे हत्यार उपसण्यापूर्वीच शासनाने हा निर्णय मागे घ्यावा. अशी मागणी निवेदन दिल्यानंतर गोर सेनेच्या कार्यकर्त्यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे. या निवेदनावर अंकुश चव्हाण, अंकुश जाधव, जगदीश जाधव शिक्षण प्रेमी युवक व नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.