उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार -NNL


मुंबई।
 सांस्कृतिक कार्य विभागामार्फत उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. अकोला जिल्ह्यातील पातूर येथील श्री. खडकेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला प्रथम, अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीतील सुवर्णयुग तरुण मंडळ शेवाळे गल्लीला द्वितीय आणि मुंबई उपनगरच्या अंधेरी येथील स्वप्नाक्षय मित्रमंडळाला तृतीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

याशिवाय 27 जिल्हास्तरीय विजेते घोषित करण्यात आले आहे. त्यांची नावे पुढीलप्रमाणे :

अ.क्रंजिल्हासार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे नाव
1अमरावतीएकविरा गणेशोत्सव मंडळ
2औरंगाबादकुलस्वामिनी प्रतिष्ठान गणेश मंडळ
3बीडजय किसान गणेश मित्र मंडळ
4भंडाराआदर्श गणेश मंडळ
5बुलढाणासहकार्य गणेश मंडळ, तालुका चिखली
6चंद्रपूरन्यु इंडिया युवक गणेश मंडळ, भानापेठ वार्ड
7धुळेश्री. संत सावता गणेश मित्र मंडळ, सोनगीर
8गडचिरोलीलोकमान्य गणेश मंडळ, आरमोरी
9गोदिंयानवयुवक किसान गणेश मंडळ, देवरी
10हिंगोलीश्री. सिध्दीविनायक सार्वजनिक गणेश मंडळ, एनटीसी
11जळगांवजागृती मित्र मंडळ, भडगांव
12जालनासंत सावता गणेश मंडळ, परतूर
13कोल्हापूरश्री. गणेश तरुण मंडळ, ढेंगेवाडी
14लातूरबाप्पा गणेश मंडळ
15मुंबई शहरपंचगंगा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ना.म.जोशी.मार्ग
16नागपूरविजय बाल गणेशोत्सव मंडळ, किराडपुरा
17नांदेडअपरंपार गणेश मंडळ
18नंदुरबारक्षत्रिय माळी नवयुवक गणेश मंडळ
19नाशिकअमरज्योत मित्र मंडळ, सातपूर
20उस्मानाबादबाल हनुमान गणेश मंडळ
21पालघरसाईनाथ मित्र मंडळ, नालासोपारा
22परभणीस्वराज्य गणेश मंडळ, देवनांदरा
23पुणेजयजवान मित्र मंडळ, नानापेठ
24रायगडसंत रोहीदास तरुण विकास मंडळ, महाड
25रत्नागिरीपालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मंडणगड
26सांगलीतिरंगा गणेशोत्सव मंडळ, विटा
27सातारासार्वजनिक क्रीडा गणेशोत्सव मंडळ, सावली
28सिंधुदुर्गसार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सालईवडा
29सोलापूरश्रीमंत मानाचा कसबा गणपती
30ठाणेधामणकर नाका मित्र मंडळ, भिवंडी
31वर्धाबाल गणेश उत्सव मंडळ, समुद्रपूर
32वाशिममंत्री पार्क गणेशोत्सव मंडळ
33यवतमाळनवयुग गणेश मंडळ

गणेशोत्सव काळात उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानुसार जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली होती. या समितीमार्फत जिल्हयातून एका उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाची निवड करण्यात आली आहे. राज्यस्तर समितीमार्फत प्रत्येकी एक याप्रमाणे प्राप्त झालेल्या एकूण 36 उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांमधून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांच्या विजेत्यांना अनुक्रमे 5 लाख, 2.5 लाख आणि 1 लाख रूपये आणि प्रमाणपत्र तसेच 33 जिल्हयातील अन्य प्रथम क्रमांकाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांसही 25 हजार रुपये आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी