हिमायतनगर/सहस्त्रकुंड। समता फाउंडेशन मुंबई आणि लायन्स नेत्र रुग्णालय नांदेड जंगमवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 4 रोजी इस्लापूर सहस्त्रकुंड नजिक असलेल्या परोटी येथे मोफत नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले होते.
या शिबिरात अनेक रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली होती. आज त्यापैकी 25 रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयाच्या वाहनाने नांदेडला नेण्यात आले आहे. उद्या सकाळी या सर्वांवर शस्त्रक्रिया होणार असून या सर्वांना दिव्यदृष्टी प्राप्त होणार आहे अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते अशोकजी पवार यांनी दिली आहे