नांदेड/बिलोली| मुख्याध्यापक-शिक्षकांच्या सन्मानाचा कार्यक्रम हा कोण्या जातीचा आणि पंथाचा नसतो तर त्यांच्या गुणांचा असतो. असे प्रतिपादन श्री गोविंद मुंडकर यांनी केले. ते गंजगाव येथील कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी माजी आमदार श्री सुभाष साबणे, श्री व्यंकट गुजरीकर, श्री लक्ष्मण ठक्करवाड, श्री विश्वनाथ संमन, निवृत्त मुख्याध्यापक श्री पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गंजगावच्या सरपंच सौ.सुनीता कानशेट्टे या होत्या.
मुंडकर पुढे म्हणाले की, ज्या गावांमध्ये रस्ते व्यवस्थित नाहीत तेथील शाळा डिजिटल करणे, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीकडे विशेष लक्ष ठेवणे , ग्रामपंचायत ,शिक्षण समिती आणि गावकऱ्यांचे चांगले नाते ठेवणे हे कौशल्य येथील आत्ताच्या आणि पूर्वीच्या शिक्षकांमध्ये होते. म्हणून गंजगाव सारख्या दुर्गम अशा सीमावर्ती भागातील शाळा संपूर्ण मराठवाड्यात उत्तम शाळा म्हणून लौकीकास येत आहे. येथील शिक्षकानी उत्तम कार्य केले. त्यांच्यात योग्य समन्वय ठेवण्याचे चांगले कार्य मुख्याध्यापक श्रीयुत जलाल खान पठाण यांनी केले आहे. पठाण यांनी पुरस्कारापेक्षा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष दिले.
सुभाषराव साबणे यांनी सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांच्या गुणांचा गौरव करत शिक्षकांच्या विविध राजकीय कलागुणांच्या बाबतीत चौफेर टोलेबाजी केली. सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांना मनस्वी शुभेच्छा दिल्या. जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण ठक्करवाड याचे समायोजित तर विश्वनाथ संमन यांचे सीमावर्ती यांच्या प्रश्नावर भाषण झाले. पत्रकार अफजल यांनी पुढाऱ्यांच्या असफलतेचा पाढा वाचला आणि जाब विचारण्याचा सल्ला दिला. निवृत्त मुख्याध्यापक श्री पठाण यांनी सविस्तर अनुभव सांगत जीवन कार्याचा आढावा घेत कृतज्ञता व्यक्त केली.
शिक्षकांच्यावतीने श्री सलीम यांनी प्रभावी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ईरवंत जामनेर यांनी केले. यावेळी सौ. सुरेखा बावलगावे (उपसरपंच), पोलीस पाटील श्री रामराव हिवराळे, सोसायटीचे चेअरमन श्री माणिकराव बासरे पाटील, सरपंच प्रतिनिधी श्री हणमंत पाटील कनसेट्टे, माध्यम प्रतिनिधी सय्यद रियाझ ,श्री बसवंत बावलगावे शांतेश्वर पाटील यांचे विशेष उपस्थिती होती. सर्व ग्रापंचायत सदस्य, शा. व्य. स. अध्यक्ष श्री साईनाथ बावलगावे व सर्व सदस्य, नवदुर्गा मंडळाचे अध्यक्ष व त्यांचे सर्व टीम, बसवंत पाटील शिवशेट्ट,व ज्येष्ठ शिक्षक श्री मिर्झापुरे , श्री रायकंठवार , श्री जामनोर , श्री मेहत्रे , श्री सैलानी तमाम गावकरी मंडळी यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.