नांदेड। जिल्हा परिषदेचे नूतन जिल्हा समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार यांनी नुकताच समाज कल्याण अधीकारी पदाचा पदभार घेतला असून त्यांचा दिव्यांगाच्या विविध प्रवर्गातील शिक्षक कर्मचाऱ्यांनी स्वागत व सत्कार केला.
जिल्हा परिषदेचे नूतन समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार यापूर्वी ही नांदेडला कार्यरत होते.त्यांच्या कार्यकाळात दिव्यांगांच्या चारही प्रवृगातील कर्मचाऱ्यांना नियमित वेतन होत असे .व त्यांचा सर्व तळागाळातील कर्मचाऱ्यांशी चांगला समन्वय असल्याने सर्व कर्मचारी त्यांचा आदर करतात.समाजकल्याण अधिकारी म्हणून पुन्हा आऊलवार हे रुजू झाल्याने सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यात आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे त्यांचा विविध संघटना व शाळेच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला.
शहरातील काबरानगर येथील छत्रपती शाहू महाराज निवासी अपंग विद्यालयाचे मुख्याध्यापक के.डी. वारभडे यांनी शाल व पुष्पहार घालून सत्कार केला यावेळी डॉ.गणेश कदम, कलाशिक्षक नामदेव फुलपगार , अधीक्षक व्यंकटरावं कपाळे, शिवराज बामणे, महेंद्र गायकवाड, अनिल चव्हाण, माधव बर्वे, यांच्यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते. सत्येंद्र आऊलवार यांनी पदभार घेतल्यामुळे दिव्यांग कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार हे मात्र निश्चित आहे.