हिंगोली। जगभरात दिव्यांगाचे सात प्रकार मानले जातात. दिव्यांग व्यक्ती जिवनात आलेल्या कठिणातल्या कठिण प्रसंगांना तोंड देतात. अशा दिव्यांग व्यक्तीच्या वाट्याला आलेले कष्ट आणि दुःख कमी करण्याच्या हेतूने हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
हिंगोली जिल्ह्यातील विविध तालुक्यातील दिव्यांगांना साहित्याचे वाटप केले जाणार असुन आज कळमनुरी तालुक्यातील ३७ दिव्यांग बांधवांना कृत्रिम हात, कृत्रिम पाय, कॅलिपर, कॉस्मेटिक ग्रोव्हज अशी साधने वाटप करण्यात आल्याने त्यांच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद दिसून येत होता खासदार हेमंतभाऊ पाटील यांच्या पुढाकाराने कळमनुरी पंचायत समितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी खासदार हेमंतभाऊ पाटील यांचे प्रतिनिधी म्हणून अमोल बुद्रुक, गटविकास अधिकारी प्रदीप बोंढारे, डॉ. आदिनाथ आंधळे, डॉ. सुभाष वर्मा यांच्याहस्ते तालुक्यातील ३७ दिव्यांग बांधवांना सामाजिक न्याय आधिकारिता मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली आलिम्को (कानपुर), महात्मा गांधी सेवा संघ संचलित हिंगोली जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने भारत सरकारच्या एडीप योजने अंतर्गत दिव्यांग बांधवांना मोफत कृत्रिम हात, कृत्रिम पाय, कॅलिपर, कॉस्मेटिक ग्रोव्हज अशी विविध साधनांचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी दिव्यांग बांधवांनी आपल्या भावना व्यक्त करताना खासदार हेमंतभाऊ पाटील यांनी पुढाकार घेऊन साहित्य वाटप केल्या बद्दल मनापासून धन्यवाद दिले. यावेळी पंचायत समितीचे सदस्य बाळासाहेब पतंगे, हिंगोली जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राचे समन्वयक दिपक गडदे, प्रकल्प समन्वयक क्रिष्णा शिरसाठ, नसीम खान, एस. आर. सोनवणे, पत्रकार दिलीप मिरटकर, बाळु ससे, नंदकुमार कदम, श्री घवाड, भगवान शिंदे, यांच्यासह दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यापूर्वी हिंगोली शहरातील ८३ व औंढा नागनाथ येथील २४ दिव्यांग बांधवांना कृत्रीम साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. तर आज शुक्रवारी (दि.१४) सेनगाव तालुका ५६ तर शनिवारी (दि.१५) वसमत तालुक्यातील ८५ दिव्यांग बांधवांना कृत्रीम साहित्यांचे वाटप करण्यात येणार आहे.