हिमायतनगर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर पाच दिवसात झाले चार अपघात -NNL

4 अपघातात एकाचा मृत्यू पाच जण गंभीर जखमींवर नांदेडला उपचार सुरू


हिमायतनगर, अनिल मादसवार।
किनवट -हिमायतनगर -भोकर हा राष्ट्रीय महामार्ग अपघाताचे केंद्र बनत चालले आहे. मागील पाच दिवसात हिमायतनगर शहरासह खडकी फाट्यावर आणि प्रस्तावित टोलनाका येथे असे मिळून चार अपघात झाले आहेत. यात एका युवकाचा मृत्यू तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. या सर्वांवर नांदेड येथे उपचार सुरू आहेत. अपघाताची सुरू असलेली मालिका पाहता तेलंगना राजाच्या धरतीवर हिमायतनगर भोकर किनवट माहूर पर्यंत नव्याने होत असलेल्या 161 या राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी स्पीड ब्रेकर लावणे आणि डिव्हायडर बसविणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत सुजान नागरिकांतून व्यक्त केले जात आहे.


हिमायतनगर शहरातून धनोडा ते भोकर पर्यंत 161 हा राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. या रस्त्याचे काम अजूनही अर्धवट अवस्थेत असून हिमायतनगर ते भोकर पर्यंत पूर्ण झाले आहेत. मात्र टोलनाकाचे काम अर्धवट अवस्थेत आहे, त्यामुळे ठीक ठिकाणी अपघात होत असून, राष्ट्रीय महामार्ग चकाचक झाल्यामुळे भरधाव वाहनांची गती वाढली आहे. अशाच प्रकारे भरधाव वेगात वाहने जात असल्यामुळे चार दिवसापूर्वी हिमायतनगर शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयासमोर भरधाव मेक्सिमोइ दुचाकीला धडक दिल्यानं परोटी येथील युवा व्यापाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारच्या रात्री खडकी फाट्यावर दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन गंभीर जखमी झाले आहेत. यातील 3 जखमींवर नांदेड येथे उपचार सुरू आहे. तर आज गुरुवारी प्रस्तावित टोल नाकाच्या ठिकाणी गतिरोधकावरून दुचाकी जात असताना पाठीमागे बसलेली महिला पडल्याने गंभीर जखमी झाली असून त्या महिलेलाही उपचारासाठी नांदेडला हलविले आहे. 


या सर्व घटना ताज्या असतानाच आज संध्याकाळी आठ वाजेच्या सुमारास पुन्हा खडकी फाट्या नजीक एका भरधाव कारणे दुचाकीला टक्कर दिली. त्यात युवक गंभीर जखमी झाला असून, हिमायतनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पुढील उपचारासाठी त्यास नांदेडला पाठविले आहे. सदर युवक हिमायतनगर तालुक्यातील खडकी येथील रहिवासी असून गजानन सूर्यवंशी असे गंभीर झालेल्या युवकाचे नाव आहे. तातडीने जखमी झालेल्या युवकास हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून परिस्थिती गंभीर असल्याने नांदेडला पुढील उपचारासाठी रवाना केले आहे. एकूणच या पाच दिवसात झालेल्या चार घटनांची आकडेवारी पाहता नव्याने झालेल्या राष्ट्रीय महामार्ग जीवघेणा बनला असल्याचे दिसते आहे.

या परिस्थितीला लक्षात घेता आगामी काळात अपघात होणार नाही त्यासाठी हिमायतनगर शहरासह प्रत्येक गावाच्या स्टॉपच्या ठिकाणी डिव्हायडर करून वाहनाच्या गतीला ब्रेक लावण्यासाठी संबंधित ठेकेदाराने रस्त्यावर स्पीड ब्रेकर लावणे गरजेचे असल्याचे मत सुजान नागरिकांतून व वाहनधारकातून व्यक्त केले जात आहे. तसेच शासनाने नशा पाणी करून वाहन चालवू नये यासाठी नियम काढलेले असताना बहुतांश मोठे वाहन चालक मध्यधुंद अवस्थेत वाहने चालवत असल्याने अपघाताला निमंत्रण मिळत असल्याचे पोलीस प्रशासनाच्या पंचनामा नंतर पुढे आले आहे. एकूणच हिमायतनगर शहरातून जात असलेला राष्ट्रीय महामार्ग मृत्यूला निमंत्रण देणारा बनत असल्याचे चित्र मागील काळात झालेल्या घटनांवरून दिसून येत आहे.

या संदर्भात खडकी फाटा येथे अपघात झालेल्या ठिकाणच्या कारचालकाशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, आमच्या गाडीचा टायर पंचर झाल्यामुळे मी पंचर काढण्यासाठी चार चाकी गाडी उभी केली होती. दुसरी स्टेफनी टायर लावल्यानंतर गाडीतील मंडळी बसली. दरम्यान त्याच वेळेस भरधाव वेगात आलेल्या दुचाकी चालकाने पाठीमागून येऊन कारला धडक दिली. दुचाकी एवढ्या स्पीड मध्ये होते कारच्या पाठीमागील डिक्की दुचाकी स्वाराच्या तोंडाला लागल्याने तो जखमी झाला असल्याचे सांगितले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी