राष्ट्रीय एकता दिनानिमित्त जिल्ह्यात एकता दौडचे आयोजन -NNL

शाळा, महाविद्यालयांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा -  जिल्हाधिकारी अभिजीत राऊत


नांदेड|
सरदार वल्लभ भाई पटेल यांची जयंती व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सोमवार 31 ऑक्टोबर रोजी एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 7 पासून पुढे जिल्ह्यात विविध शैक्षणिक संस्था, महाविद्यालये, सेवाभावी संस्था यांनी राष्ट्रीय एकतेसाठी यात पुढाकार घेवून  उत्स्फूर्त सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.

संपूर्ण जिल्ह्यातून एकात्मतेचा हा संदेश पोहचविण्यासाठी विविध शैक्षणिक संस्थानी आपली तयारी पूर्ण केली आहे. या संदर्भात उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दिनांक 28 ऑक्टोबर 2022 च्या शासन निर्णयाद्वारे सूचना निर्गमित केल्या आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवातर्गंत 25 ते 31 ऑक्टोबर 2022 हा कालावधी एकतेचा उत्सव साजरा केला जात येत आहे. 

या अंतर्गत सोमवार 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय ते सरदार वल्लभ भाई पटेल यांचा पुतळा, जुना मोंढा या दरम्यान दौडचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची जिल्हा प्रशासनामार्फत सर्व तयारी करण्यात आली आहे.  सहभागी होवू इच्छिणाऱ्या नागरिकांनी, युवकांनी  सकाळी 7.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात उपस्थित राहावे, असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे. यानिमित्ताने डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले असून यात सचित्र माहिती देण्यात येणार आहे. या प्रदर्शनीचे उद्घाटन मान्यवराचे हस्ते केले जाणार असून  या समारंभाचा व प्रदर्शनीचा लाभ घ्यावा, असेही प्रशासनाने सांगितले आहे. 

 सोमवारी दक्षता जनजागृती सप्ताहास प्रारंभ - भ्रष्टाचार मुक्त भारत –विकसित भारत  ही संकल्पना घेऊन जिल्ह्यात सोमवार 31 ऑक्टोंबर ते  रविवार 6 नोव्हेंबर 2022 या  कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे. सर्व विभाग व त्यांच्या नियंत्रणाखाली सर्व विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख, राज्य शासनाचे अंगीकृत उपक्रम, सहकारी संस्था, स्वायत्त संस्थामार्फतया कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्याच्या सूचना शासनाच्यावतीने दिल्या आहेत. 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता भ्रष्टाचार निर्मूलनाची प्रतिज्ञा घेण्यात येणार आहे. या सप्ताहात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याबाबत परिपत्रकान्वये विविध विभागांना निर्देशित करण्यात आले आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी