हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव तालुक्यातील प्रशासकीय बहुतांश पदे अनेक वर्षापासून प्रभारावर असल्याने ते प्रभारी. काही नेत्याच्या व सोयीचे आसल्याने या बाबतीत जिल्हाआधिका-याकडे फारशी मागणी . कायमस्वरुपी अधिका-या करिता आग्रह धरण्यात येत नाही परिणाम स्वरुप नागरिकां कामा बाबतीत प्रश्नचिन्ह निर्माण होत आसले तरी या बाबतीत तालुक्यातील कोणाताही जबाबदार नेता या विषयी गंभीर आसल्याच दिसुन येत नाही.
शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांच्या कामात कमालीचा चलढकलपणा वाढलेला आहे यामुळे नागरिक कमालीचे वैतगलेले दिसुन येत आहे. नागरिकांच्या कामात दिरंगाई मुळे कायमस्वरुपी अधिका-याची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी तालुक्यातील काही जागरुक नागरिक हदगाव विधानसभाक्षेञ आ.माधवराव पा.जवळगावकर व खा हेमत पाटील यांच्याकडे साकडे घालणार आहेत.
नादेड जिल्ह्यातील सर्वात जुना हदगाव तालुक्याची ओळख आहे. निवडणूक काळात जाहीर सभांना उतु व नेत्यांच्या आश्वासनाने तृप्त झालेलं तालुका म्हणून ओळख आहे. तालुक्यात जवळपास १२५ ग्रामपंचायती व एक नगरपालिका आहे. तालुक्यात कोणत्या शासकीय योजना येतात. केवळ विशेषतः नेत्यांनाच माहीत असतेअशी परिस्थिती निर्माण झालेली दिसुन येते माध्यमाना हे अधिकारी शासकीय योजना बद्दल माहीती देण्याचे टाळतात ही वस्तुस्थिती आहे. शहरात व तालुक्यात राज्य व केद्र शासनाच्या कोणत्या योजना आहेत. हे प्रत्येक नागरिका पर्यत पोहचायला हवे पण ह्या योजनांची माहीती हवी. तशी प्रशासकीय स्तरावर होत नसल्याने काही ठराविक नागरिकांनाच याचा लाभ मिळतो अस ञस्त नागरिकांचे म्हणने आहे.
ह्या योजना पोहचविण्यासाठी सर्वच प्रशासकीय कार्यालय आहेत. परंतु गेल्या काही वर्षापासून म्हत्वाच्या प्रशासकीय कार्यालय मध्ये कर्मचारी अधिका-याची कमतरता असल्याने बहुसंख्य कार्यालयाचा प्रभार दुय्यम आधिका-याकडे सोपविण्यात आले. यात प्रामुख्याने नगरपरिषद पंचायत समिती गटशिक्षणआधिकारी व पोलिस स्टेशन प्रभारी आधिकारी ई. कार्यालय आहेत. तालुक्यातील महत्त्वाचे विभागातील पदे प्रभावर असल्याने कार्यालयातील काही कर्मचा-याची मनमानी खुलेआम सुरु आसल्याचे दिसुन येत आहे. हे कर्मचारी कार्यालयात आपल्या मर्जीप्रमाणे कार्यालय मध्ये येतात हि वस्तुस्थिती आहे.
पुर्ण वेळ आधिकारी हवा - प्रभारी अधिका-याच या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण दिसुन येत नाही कार्यालयीन वेळाच्या आताच अपडाऊन करणारे लगेच निघुन जाताना दिसुन येतात. त्यामुळे नागरिकांची अनेक कामे होत नसल्याचे तक्रारी आहेत नागरिकांची गैरसोय पाहता शासकीय कार्यालय मध्ये कायमस्वरुपी अधिका-याची नियुक्ती करावी अशी मागणी जोर धरीत आहे.