उस्माननगर, माणिक भिसे। तथागत भगवान बुद्धांचे विचार जीवनामध्ये अंगीकारून त्याचे अनुकरण केल्यास त्रिशरन ,पंचशील, अष्टांग मार्गावर चालल्यास मानव जातीच्या जीवनाचे कल्याण होते असे प्रतिपादन जि.प.सदस्या तथा भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ.प्रणिताताई देवरे चिखलीकर यांनी कलंबर( बु.) भोपाळवाडी येथील तथागत भगवान गौतम बुद्ध मूर्तीच्या वर्धापन दिनानिमित्त मार्गदर्शन करताना केले.
शांतीदूत बुद्ध विहार सिध्दार्थनगर,भोपाळवाडी ,कलंबर बु. ता.लोहा येथे विश्र्वाला शांतीचा संदेश देणारे महाकरुनीक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्ती स्थापनेचा तेरावा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि पंचशील ध्वजाचे ध्वाजारोहण भाजपा प्रदेश उपाध्यक्षा तथा प्रसिध्द सामाजिक कार्यकर्त्या जि.प.सदस्या सौ. प्रणिताताई देवरे चिखलीकर यांच्या हस्ते झाले.
यावेळी शिवाभाऊ नरंगले ( वंचित बहुजन आघाडी नांदेड दक्षिण) बालाजी परदेशी ( मा.जि.सदस्य कलंबर बु.सर्कल नांदेड ) भाजपा तालुकाध्यक्ष आनंदराव पाटील शिंदे, कलंबरचे सरपंच मन्नुसिंग लाल,माजी सरपंच श्रीधर गोरे , नरेंद्र गायकवाड ( मा. उपसभापती प.स.लोहा) रावसाहेब पाटील भोपळे, युवा नेते जीवन पाटील भोपळे , वंचित बहुजन आघाडीचे नेते शंकरराव पाटील घोरबांड , प्रकाश घोरबांड ( मा.उपसरपंच कलंबर खु.) मार्केट कमिटीचे सचिव आनंदराव पाटील घोरबांड,बळी पाटील मलकापुरे , मधुकर मामा , दिलीप पाटील डांगे, यांच्यासह गावातील व परिसरातील प्रतिष्ठीत मान्यवर पाहूणे विचार पिठावर उपस्थित होते.सर्व उपस्थित मान्यवरांचे पुष्पहार घालून स्वगत करण्यात आले.
पुढे बोलताना म्हणाल्या की, जीवनामध्ये यश संपादन करायचे असेल तर बुद्धांच्या तत्वज्ञान अंगीकारले पाहिजे सध्या प्रत्येक मानव हा वेगवेगळ्या विचारावर चालत असल्यामुळे मानवाची अधोगती होत आहे. तथागत भगवान गौतम बुद्धांनी मानव जातीच्या कल्याणासाठी पंचशील व अष्टांगिक मार्ग दिला आहे मानवाने त्याच्या मार्गावर
चालून जीवनामध्ये त्याचे तंतोतंत पालन केल्यास मानवाची प्रगती व्हायला वेळ लागत नाही .सर्वांनी जीवनामध्ये त्याचे काटेकोरपणे पालन करून आपले जीवन यशस्वी करण्यासाठी उपासक उपासुकींनी पालन करणे गरजेचे आहे .त्यामुळे जीवन सुखमय होते .असे त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. सर्वप्रथम महामानवांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .
दुपारी गावातील प्रमुख रस्त्याने तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक काढण्यात आली.रात्रीला महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक प्रमोद लोखंडे लातूर व महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका अशा चखे बुलढाणा या दोन पार्ट्याचा दणदणीत कार्यक्रम झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संभाजी कांबळे, संदीप कांबळे , सुरेश वाघमारे , देविदास वाघमारे ,विश्वांभर गायकवाड , पंडीत कांबळे , गंगाधर हानवंते ,यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाल परिसरातील बोध्दसैनिक , उपासक,उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.