नांदेड| नांदेड जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळ नांदेड सलग्न महाराष्ट्र राज्य विक्रेता संघटनेच्या २३ वा वर्धापन दिन व भारतीय वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता माता गुजरिजी विसावा उद्यान पार्किंग येथील वृत्तपत्र वितरण सेंटरमध्ये कॉ.अनंतराव नागापूरकर पत्रकारिता व वृत्तपत्र विक्रेता राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे कार्याध्यक्ष बालाजी पवार यांनी दिली आहे.
नांदेड जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळ नांदेड सलग्न महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचा १५ ऑक्टोबर रोजी वर्धापन दिन साजरा करण्यात येणार असून भारतीय वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त कॉ.अनंतराव नागापूरकर पत्रकारिता पुरस्कार , रमेश चित्ते तसेच वृत्तपत्र विक्रेता राज्यस्तरीय पुरस्कार शिवाजी वाकोडे (खेडकर - परभणी) यांना प्रदान करण्यात येणार आहे.
याच कार्यक्रमात वृत्तपत्र विक्रेत्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार, जेष्ठ वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार करण्यात येणार असून त्यानिमित्त वृत्तपत्र विक्रेता स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घघाटन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात येणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.अमरनाथ राजूरकर तर प्रमुख पाहुणे म्हणून महापौर जयश्री पावडे, आयुक्त डॉ.सुनिल लहाने, स्थायी समितीचे सभापती किशोर स्वामी, ज्येष्ठ साहित्यिक प्रा.जगदिश कदम, पत्रकार शंतनू डोईफोडे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, कामगार नेते कॉ.प्रदिप नागापूरकर, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे कार्याध्यक्ष बालाजी पवार यांची उपस्थिती राहणार आहे. दरम्यान यावेळी आ.बालाजीराव कल्याणकर यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन समिती प्रमुख चंद्रकांत घाटोळ, उपाध्यक्ष गणेश वडगावकर, कोषाध्यक्ष बाबु जल्देवार, सचिव अवधूत सावळे, सहसचिव श्यामसिंह चंदेल, प्रसिध्दी प्रमुख बालाजी चंदेल, सरदारसिंह चौहाण, चेतन चौधरी, संदिप कटकमवार, व्यंकटेश अनलदास, सतिश कदम, बालाजी सुताडे, सुनिल व्यवहारे, अनंत संगेवार, हबीब उबेद, देवबा डोरले, बाबुराव बडुरे, भागवत गायकवाड, गजानन पवार, विनायक आंधे, अनुप ठाकुर, लखन नरवाडे, खय्युम पठाण, अवधुत पसलवाड, रामेश्वर पवार, शंकर हुस्से आदींनी केले आहे.