विद्यार्थिनींच्या सुप्त कलागुणांना वाव देत गांधीजिंच्या जयंती निमित्त शाळेत भव्य रांगोळी स्पर्धा
हिमायतनगर, कृष्णा राठोड। शहरातील एकमेव सीबीएससी इंग्लिश मेडीयम शाळा असणाऱ्या गुरुकुल इंग्लिश स्कूल शाळेत दि.०३ रोजी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी शाळेचे सचिव तथा कार्यवाह डॉ.मनोहर राठोड हे होते. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रिन्सिपल मा. प्रफुलजी भोसले सरांनी उपस्थिती दिली. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून त्यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करण्यात आले.
यानंतर शाळेतील उपस्थित सर्व शिक्षकांनीही पुष्प अर्पण करून बापुंच्याच्या प्रतिमेस अभिवादन केले. शाळेतील काही विद्यार्थी, विद्यार्थिनींनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवन चरित्राची व त्यांच्या महान कार्याविषयी सखोल अशी माहिती सांगत विद्यार्थ्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अतोनात प्रयत्न केल्यानेच आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. तें भारत मातेचे थोर सुपुत्र भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार तसेच जगाला अहिंसेचा महान संदेश देणारे गांधीजी हे एक वंदनीय "युगपुरुष' होते. ते आपल्या कर्तृत्वामुळे महात्मा, राष्ट्रपिता, बापू अशा अनेक पदापर्यंत पोहोचले.
आजही त्यांना आपण आदराने "बापू " या नावाने स्मरण करतो असे.....सहशिक्षक गजानन जाधव सरांनी आपला भाषणातून विद्यार्थ्यांना सखोल अशी माहिती देताना बोलत होते. भाटे सर, विशाल शितळे सरांनी ही या महान नेत्यांच्या जीवनावर प्रकाश टाकत भाषणे केली. त्यानंतर महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त शाळेचे संचालक तथा कार्यवाह व डॉ. राठोड सरांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देत खास विद्यार्थिनींसाठी भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेच्या विद्यार्थिनींचा प्रथम, व्दितीय क्रमांक काढणार असल्याचे व प्रथम क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थिनीस प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याचेही संचालक राठोड सरांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पवार सर कार्यक्रमाचे आभार भाटे सर यांनी केले.
यावेळी उपस्थित शाळेचे सचिव तथा कार्यवाह डॉ.मनोहर राठोड, प्रिन्सिपल प्रफुल भोसले सर, सचिन खिल्लारे,पवार सर,भाटे सर, गजानन जाधव सर, पंगणवाड सर,विजय जाधव सर गुंडेकर सर, शितळे सर, आर के राठोड सर,राठोड मॅडम, पुष्पा मॅडम, भाटे मॅडम गिरी मॅडम, दिपाली मॅडम, यासह शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.