मुखेड। जिप्सी मॉर्निंग ग्रुपच्या वतीने मुखेड ते सलगरा (बू) येथे पायी प्रवास करुन येथील प्रसिद्ध दुर्गा माता मंदीर व परिसर स्वच्छता करुन महा आरती केली.
सलगरा (बू) येथील दुर्गा माता मंदीर परीसरात भक्तांचे श्रद्धास्थान बनले आहे. दसऱ्याच्या दिवशी या मंदिरात भाविकांची विशेष गर्दी असते. जिप्सी मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष प्रा. जय जोशी हे मागील दहा वर्षांपासून आपले कुटूंबीय व अनेक भक्तासह पायी यात्रा करतात. यंदा जिप्सी च्या पुढाकारातून भक्तांची संख्या वाढली. दरवर्षी विजया दशमीच्या शुभमुहूर्तावर मुखेड ते सलगरा (बू) पायी प्रवास करून यास व्यापक रुप देण्याचे जिप्सीयन्सनी ठरविले आहे. सर्वांनी दुर्गा माता मंदीर व परिसर स्वच्छ करुन महा आरती केली. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने माजी सरपंच उद्धव पाटील श्रीरामे, पुजारी बालाजी महाराज, विठ्ठल मेहत्रे,
पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते शेख उजाल, अंकुश श्रीरामे, यांनी जिप्सीयन्सचे यथोचित स्वागत केले. यावेळी जिप्सी मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक दादाराव आगलावे, अध्यक्ष प्रा.जय जोशी, जिप्सी भूषण बलभीम शेंडगे, बालाजी तलवारे, वैजनाथ दमकोंडवार, प्रा. डॉ. स्वानंद मुखेडकर, हणमंत गुंडावार, डॉ. सतिश बच्चेवार, उत्तम अमृतवार, गोविंद जाधव, सतीश खोचरे, विठ्ठल बिडवई, सुरेंद्र गादेकर, नामदेव श्रीमंगले, अरुण पत्तेवार, सुरेश उत्तरवार आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिप्सीच्या या स्तुत्य उपक्रमाचे अनेकांनी कोतुक केले.
पुढील वर्षी पदयात्रेस व्यापक रुप देणार- प्रा.जय जोशी मुखेड ते सलगरा (बू) या पदयात्रेत येत्या विजया दशमीच्या मुहूर्तावर जिप्सी च्या सहकार्यातून व्यापक रुप देण्याचा मानस असून मुखेड येथील भक्तांचा उत्सुर्त प्रतिसाद असेल. यासाठी सलगरा येथील ग्रामस्थांच्या सहकार्याची अपेक्षा आहे असे प्रतिपादन जिप्सी मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष प्रा. जय जोशी यांनी केले.