नांदेड| हडकोतील ज्ञानेश्वरनगरमधील रहिवासी,सामाजिक कार्यकर्ते अनंत विश्वांभर घारापूरकर यांचे अल्पशा आजाराने मुंबईत २१ ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्यांचे पार्थिव रुग्णवाहिकेने नांदेडमध्ये आणण्यात आला. शनिवारी सकाळी १०.३० वाजता सिडकोतील वैकुंठभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी,लहान मुलगा,मुलगी, भाऊ,भावजय,पुतणे,बहीण असा परिवार आहे. विशेष म्हणजे घारापूरकर हे व्यवसायाने ऑटोचालक असून आणि गंभीर आजारी असूनही ब्राह्मण सहाय्यता संघाच्या शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात सक्रिय होते. या उपक्रमातील लाभार्थींपर्यंत पोहोचून त्यांनी माहिती संकलित केली होती. त्यांच्या निधनानंतर ब्राह्मण समाजातील अनेकांनी त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत दिली. तसेच वैकुंठभूमीत त्यांना उपस्थितांनी दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रध्दांजली वाहिली.