ऐन दिवाळीत शेतक-यावर दुःखाचा डोंगर
उस्माननगर/वसमत। आज सकाळी वसमत तालुक्यातील आसेगाव तर्फे गुंज येथे अतिवृष्टीसह ढगफूटी झाल्याने येथील शेतकरी तुकाराम नरवाडे यांची म्हैस नाल्याला आलेल्या पूरामध्ये वाहून जावून लाकडाला आडकून मृत आवस्थेत आढळून आल्याने ऐन दिवाळीच्या सणात शेतक-यावर दुःखाचा डोंगर कोसळला.
मागील अनेक दिवसांपासून हिंगोली जिल्ह्य़ात पावसाने हाहाकार माजवील्याने शेतकरी हैराण ल झाले आहेत . सध्या शेतकरी शेतातील सोयाबीन, कापूस,काढण्यात व्यस्त असताना परतीच्या पावसाने दिवाळीत शेतक-यावर संक्रात आली आहे.
दिनांक २१ ऑक्टोबर रोजी सकाळी वसूबारसच्या दिवशी शेतातील आखाड्यात असलेली म्हैस ढगफूटी पावसामुळे शेतातील नाल्याला आलेल्या पूरामंळे वाहून जावून नळीला अडकून मृत आवस्थेत आढळून आल्याने शेतक-यावर दिवाळीच्या तोंडावर संकट कोसळले. आसेगाव तर्फे गुंज तालुका वसमत जि.हिंगोली येथील तूकाराम नागोराव नरवाडे यांच्यावर असमानी संकट कोसळल्याने फार मोठी हानी झाली आहे. शासनाने तात्काळ मदत करावे अशी मागणी होत आहे.