नांदेड। वेळोवेळी प्रशासनाकडे पाठपुरावा करुन पण 25 टक्के आगाऊ पिक विमा वाटप करीत नसल्यामुळे तात्काळ नांदेड जिल्ह्यातील शेतकर्यांना दिवाळीपुर्व 25 टक्के आगाऊ रक्कम जमा करण्याचा मागणीसाठी बालाजी पाटील सांगवीकर, बालाजी पाटील ढोसणे,अनिल दापके,गजानन पा.होटाळकर,अकुंश पा.कोल्हे या शेतकरी पुञाने आमरण उपोषण सुरु केले होते. पण मा. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांच्या लेखी पिकविमा मंजुरी पञानंतर उपोषण माघार घेतल्याचे शेतकरी पुञ संर्घष समितीचे बालाजी ढोसणे यांनी सांगीतले.
नांदेड जिल्ह्यातील शेतकर्यांचे अतिवृष्टीने प्रतिकुल हंगामात 50 टक्के पेक्षा जास्तीचे नुकसान झाल्याने मिड अडवायझरी सिझन लागु केल्याने तात्काळ अधिसुचना जिल्हाधिकारी साहेबांनी काढली होती व एक महीन्यात आगाऊ रक्कम शेतकर्याच्या खात्यात वर्ग करणे बंधनकारक होते पण एक महिन्या पेक्षा ही जास्तीचे दिवस लोटुन पण पिकविमा कंपनी टाळाटाळ केल्याने व ईतर जिल्ह्यातील विमा कंपनीने दिवाळीपुर्व वाटप केल्याने शेतकरी पुञानी आमरण उपोषणाची पविञा घेत आमरण उपोषण सुरु केले होते.
यांची दखल घेत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी युनायटेड इंडीया पिक विमा कंपनीला वाटप करण्याचे आदेश देवुन पिक विमा मंजुर केल्याचे जाहीर याचा लाभ 93 महसुल मंडळाला होईल असे लेखी दिल्यानंतर राञी सात वाजता उपोषणाण माघे घेण्यात आले. शेतकरी पुञाच्या उपोषणामुळे ऐन दुष्काळात शेतकर्यांना दिलासा मिळणार असल्याचे बालाजी ढोसणे,बालाजी सांगवीकर,गजानन होटाळकर,अनिल दापके,अंकुश कोल्हे यांनी सांगीतले.
यावेळी उपोषणकर्त्याची माजी मुख्यमंञी अशोकराव चव्हाण यांनी दुरध्वनीद्वारे तर,सामजीक कार्यकर्त्या आशाताई शिंदे हे उपोषणस्थळी भेट दिली रविशंकर चलवदे यांची भेट घेतली. लंडनला असलेले नांदेड दक्षिणचे आमदार मोहनअण्णा हंबर्डे यांनी दुरध्वनीद्वारे जिल्हाधिकारी व उपोषणकर्त्याची चर्चा घडवुन आणली उपोषणाला संभाजी ब्रिगेडसह विविध संघटना पक्षानी पाठींबा दिला.