मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत बैठक
हिंगोली/नांदेड। हळद उत्पादनात देशभरात ख्याती असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील हळदीस स्वतंत्र ओळख मिळावी यासाठी खासदार हेमंत पाटील यांनी पुढाकार घेत केंद्रीय बंदरे, जहाजे आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे काही दिवसापूर्वीच जिल्ह्यातील भेंडेगाव येथे ड्रायपोर्ट केंद्र उभारला जावे अशी लेखी मागणी केली होती.
ड्रायपोर्टसाठी केंद्राने समती देत राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबई येथे नुकतीच बैठक पार पडली. यात हिंगोलीतील भेंडेगाव येथे ड्रायपोर्ट स्थापनेला खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नाने झाली सुरुवात झाली आहे.
एकुण हळद उत्पादनापैकी एकट्या हिंगोली जिल्हा व परिसरातील शेतकरी पन्नास टक्के हळदीचे उत्पन्न घेतात. परंतू आजपर्यंत त्यांच्या हळद पिकास सन्मानजनक दर मिळालेला नाही. कृषी मालाच्या आणि प्रामुख्याने हळद पिक निर्यातीला भविष्यात चालणा मिळावी यासाठी जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील भेंडेगाव येथे ड्रायपोर्ट उभारले जावे अशी खासदार हेमंत पाटील यांनी मागणी केली असता. त्यास केंद्राकडुन सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे नुकतीच मुंबई येथे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमुळे भेंडेगाव येथे लकरच ड्रायपोर्ट केंद्र उभारणीला सुरुवात करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकरी आणि व्यापारी वर्ग सुखावला जाईल गाव परिसरातील कुशल व अर्धकुशल होतकरु तरुणाईच्या हातास रोजगार मिळेल असा खासदार हेमंत पाटील यांनी यानिमित्ताने विश्वास व्यक्त केला.
खासदार हेमंत पाटील म्हणाले की, ड्रायपोर्टची सुविधा उपलब्ध झाल्यास उद्योगांना अगदी कमी वेळेत कच्चा माल अगदी सहज उपलब्ध होऊ शकेल. वाहतूक खर्च कमी आणि उत्पन्नात वाढ होईल. हिंगोली लोकसभा मतदारसंघ व आजूबाजूच्या नांदेड, परभणी, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यातील उत्पादित झालेली हळद देशासह परदेशात निर्यात करुन हळदीला जागतिक बाजारपेठ मिळू शकेल असा असे देखील खासदार हेमंत पाटील यांनी म्हटले आहे. मुंबईत पार पडलेल्या या बैठकीस महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी व उद्योग विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.