नांदेड| येथील अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली बुद्ध आणि त्याचा धम्म या पवित्र ग्रंथाची सांगता तसेच दहा दिवसीय बाल श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
यात अठरा जणांना दीक्षा देण्यात आली. यावेळी बोलतांना भदंत पंय्याबोधी थेरो म्हणाले की, ‘मी संपूर्ण भारत बुद्धमय करीन’ असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते. बाबासाहेबांचे हे स्वप्न पूर्ण व्हावे अशी सदिच्छा प्रत्येक बाबासाहेबांचे अनुयायी नेहमी व्यक्त करीत असतात. मात्र, तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रातील भिक्खू संघ श्रामणेर दीक्षा कार्यक्रमाच्या माध्यमातून काही अंशी प्रयत्न करीत आहेत. समता, स्वातंत्र्य आणि न्याय बंधुता या चतु:सुत्रीवर आधारलेली भारतीय लोकशाही ही बौद्ध धम्माचेच प्रतिबिंब आहे.
बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथ वाचनाच्या समारोपानिमित्त पूज्य भदंत पंय्याबोधी थेरो (नांदेड ) यांच्या मार्गदर्शना खाली तथागत बुद्ध विहार, सुभेदार रामजी आंबेडकर नगर कवठा रोड वसमत या ठिकाणी श्रामणेर शिबिराचे आयोजन दि. ११ ते २१ आॅक्टोबर असे दहा दिवसीय बाल श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात सक्षम खरे, राजवीर आवटे, शौर्य कोल्हे, शंतनु कोल्हे, आदर्श सरतापे, विश्वरत्न गायकवाड, सखाराम खिल्लारे, आनंद श्रावणे, प्रणव पांडवीर, तुषार खंडागळे, यश आवटे, सोहम साळवे, आदित्य कांबळे, रुपेश सुर्यवंशी, सम्राट कोल्हे, वैभव खंदारे, शुभम साळवे, प्रथमेश जाधव यांना दीक्षा देण्यात आली.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म'या ग्रंथवाचन समारोप सोहळा आणि श्रामणेर प्रशिक्षण शिबिराचा समारोप कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन कैलास जोंधळे, राजेंद्र वेडे, अॅड.रवी वाहुळे, गजानन कांबळे व समस्त सुभेदार रामजी आंबेडकर नगर बौद्ध उपासक उपासिका व मित्र मंडळाने केले आहे.