नांदेड| महाराष्ट्र सार्वजनिक अधिनियम २०१६ च्या तरतुदीनुसार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेसाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापन गटातून सहा आणि प्राचार्य गटातून दहा प्रतिनिधी निवडण्यासाठी दि.९ ऑक्टोबर रोजी मतदान घेण्यात आले होते. त्याचा निकाल कुलसचिव तथा निवडणूक अधिकारी डॉ. सर्जेराव शिंदे यांनी जाहीर केला आहे.
व्यवस्थापन गटातून सहा प्रतिनिधी निवडून द्यायचे होते. त्याचा निकाल पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आलेला आहे. श्री. नरेंद्र चव्हाण, श्री. धनराज जोशी, श्री. नवनाथ चव्हाण, श्री. रामेश्वर पवार यांची निवड जाहीर करण्यात आलेली आहे. महिला श्रेणीतून श्रीमती कुसुम पवार यांची निवड जाहीर करण्यात आलेली आहे. अनुसूचित जमाती श्रेणी निरंक आहे.
प्राचार्य गटासाठी निवडणुकीद्वारे खुला श्रेणीतून डॉ.दिपक बच्चेवार, डॉ. वसंत भोसले, डॉ. महादेव गव्हाणे, डॉ. अशोक गवते, डॉ. दिलीप मुगळे हे विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. महिला श्रेणीतून अशा मुंडे या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. अनुसूचित जाती श्रेणीतून निवडणुकीद्वारे डॉ. बालाजी कांबळे निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. अनुसूचित जमाती निरंक आहे. निरधीसुचित जमाती किंवा भटक्या जमाती या श्रेणीतून निवडणुकीद्वारे डॉ. रावसाहेब जाधव हे निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. इतर मागासवर्गीय श्रेणीतून डॉ. संजय वाघमारे यांची निवड घोषित करण्यात आलेली आहे. असे विद्यापीठाचे कुलसचिव तथा निवडणूक अधिकारी डॉ. सर्जेराव शिंदे यांनी कळविले आहे.