नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील माध्यमशास्त्र संकुल आणि दैनिक प्रजावाणी यांच्या संयुक्त विद्यमाने 'पत्रकारितेतील बदलते प्रवाह' या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
माध्यमशास्त्र संकुलात शनिवार दि. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वा. होणाऱ्या या व्याख्यानात विद्यार्थ्यांशी हितगुज साधण्यासाठी महाराष्ट्र टाईम्सचे माजी सहसंपादक, राजकीय विश्लेषक सुरेश भटेवरा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
यावेळी प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे, ज्येष्ठ पत्रकार संजीव कुळकर्णी यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. पत्रकारितेचा अभ्यास करणारे विद्यार्थी, अभ्यासक, संशोधक आणि माध्यमशास्त्र प्रेमींनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक प्रो. डॉ. दिपक शिंदे यांनी केले आहे.