नविन नांदेड। दिपवाली सणाचा निमित्ताने लातुर फाटा येथील जया हुंडाई सुजया इंटरप्रायजेस शोरुम लातुर फाटा २४ आक्टोबंर रोजी लक्ष्मीपूजन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी आमदार अमिता भाभी चव्हाण व सुजया ,जया यांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी नवीन वाहन खरेदी ग्राहकांना चाबी व उत्कृष्ट कर्मचारी सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला, मोठ्या संख्येने कर्मचारी ऊपसिथी होती.
लातूर फाटा नविन नांदेड भागातील जया हुंडाई येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दिवाळी निमित्ताने माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण व चव्हाण परिवारातील सदस्य यांनी विधीवत पूजन करण्यात आले, यावेळी शोरुम मधील दिवाळी निमित्ताने ग्राहकांनी विकत घेतलेल्या नवीन वाहनांची संबंधितांना चाबी यावेळी देण्यात आल्या, चव्हाण परिवारातील सदस्य यांच्ये स्वागत व्यवस्थापक सतिश राठी यांनी केले.जया हुंडाई येथे उत्कृष्ट कार्याबद्दल सात जणांना सन्मान चिन्ह,भेट वस्तू देऊन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी अमृतराव भेडेकंर, सर्व्हिस मनेजर बक्षीसिह , उज्ज्वल संचालक मोहन पाटील, मनोहर ऐलाने , व्यवस्थापक सतिश राठी, यांच्या सह विविध विभागांतील प्रमुख पदाधिकारी व कर्मचारी यांच्यी उपस्थिती होती. फटाक्यांच्या आतिषबाजी व शोरुम वर आकर्षक अशी सजावट व रोषाणाई दिवाळी निमित्ताने करण्यात आली होती.