लोहा| जिल्ह्यात शिवसेनेत फूट पडली होती शिवसेना खासदार-आमदार यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता तरीही लोहा कंधार मध्ये शिवसेना शिंदे गटाची पाटी कोरीच होती. पण उपनेते खा हेमंत पाटील यांच्या नेतृत्वात प्रमुख पदाधिकारी यांनी प्रवेश केला आहे.काँग्रेस पक्षाने नेते खा.राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नांदेड जिल्ह्यात आगमन करीत असतानाच खासदार हेमंत पाटील यांनी शिवसेना काँग्रेस पक्षातील पदाधिकारी याना शिवसेना शिंदे गटात प्रवेश देत जबर धक्का दिला. यावेळी जिल्हा प्रमुख आनंदराव बोढारकर यांची विशेष उपस्थित होती. प्रवेश करणाऱ्यांत शिवसेनेचे विधानसभा संघटक मिलिंद पाटील पवार, कंधार शहर प्रमुख धनराज लुंगारे, युवक काँग्रेसचे विधानसभा माजीअध्यक्ष युवराज वाघमारे, कृउबा माजी संचालक बालाजी बहिरे यासह प्रमुख पदाधिकारी समावेश आहे.
लोहा कंधार विधानसभा मतदारसंघात मागील काळात मविआची सता असतानाही काँग्रेस -शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना कोणीच विचारले नाही आणि सतेचा लाभ ही झाला नाही. तशीच अवस्था आ श्यामसुंदर शिंदे यांच्या कार्यकर्त्यांची आहे. या दोन्ही तालुक्यात काँग्रेस पक्षात जे खा चिखलीकर यांच्या विरोधात बोलतात त्यांना काही काळ संधी मिळते कालांतराने त्याची जागा नवीन येऊन भरून घेतात. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेस पक्ष गेल्या दोन दशकात सत्ता असली तरी वाढलाच नाही आणि वाढेल याची खुद्द याच पक्षातील कार्यकर्ते नेते यांना शाश्वती नाही.
पक्षाचे काम इमानदारीने करूनही दाखल घेतली जात नाही असा नाराजीचा सूर आवळत मतदार संघातील मोठे प्रस्थ डॉ श्याम पाटील तेलंग व त्याच्या सहकार्यांनी खा चिखलीकर यांचे नेतृत्व स्वीकारले तर आज युवक काँग्रेसचे माजी विधानसभा अध्यक्ष युवराज वाघमारे यांनी काँग्रेस पक्षाच्या सोडचिठ्ठी दिली. ते दीर्घकाळ नगरसेवक होते. शिवसेना शिंदे गटाचे उपनेते खा हेमंत पाटील यांनी लोहा कंधार तालुक्यात शिंदे गटाची कोरी पाटी आज भरून काढली. उपजिल्हा प्रमुख बाळू पाटील कऱ्हाळे यांच्या एकाधिकार व सोयीच्या कार्यपद्धतीवर नाराज होत त्याच्या विश्वासू सहकाऱ्यांने त्याची साथ सोडली.
लोहा – कंधार विधानसभेचे अध्यक्ष मिलिंद पवार, कंधारचे शिवसेना शहरप्रमुख धनराज (बाळु) लुंगारे, मार्केट कमिटीचे माजी संचालक जुने शिवसैनिक बालाजी बहिरे व कार्यकर्त्यांनी तसेच आ श्यामसुंदर शिंदे यांचे विश्वासू शेका पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष मारोतराव यजगे, यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. उपजिल्हा प्रमुख बाळू पाटील कऱ्हाळे यांच्या सोबत राहणाऱ्यांना पक्षाला जय महाराष्ट्र केला. त्यामुळे त्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.खा हेमंत पाटील यांनी जिल्ह्यात आपल्या नेतृत्वात तालुकानिहाय शिवसेना शिंदे गट बळकट करण्यासाठी मोहिम हाती घेतली असून त्यात ते यशस्वी होताना दिसताहेत.