नांदेड| माजी सैनिक, विधवा व इतर नागरिकांच्या पाल्यांसाठी अत्यल्प दरामध्ये सर्व सोयीयुक्त सैनिकी मुलांच्या वसतीगृहामध्ये प्रवेश प्रक्रिया सन 2022-23 साठी सुरु झाली आहे. जिल्हयातील सर्व माजी सैनिक/विधवा यांनी याचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी वसतीगृह अधिक्षक यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 8918774880 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयानी केले आहे.
सैनिकी मुलांचे वसतिगृह विष्णुपुरी हे जिल्हा सैनिक कार्यालयांतर्गत चालविण्यात येते. प्रवेश सैनिक/ माजी सैनिकांच्या तसेच इतर नागरिक पाल्यांना सुध्दा उपलब्ध आहेत. प्रवेशासाठी प्रवेश अर्ज सैनिकी मुलांचे वसतीगृह, विष्णुपुरी, नांदेड येथे विक्रीस उपलब्ध आहेत. अधिक माहीतीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क करावा. तसेच संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असेही आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने केले आहे.
माजी सैनिकांसाठी सीएसडी कॅटीन सुविधा
नांदेड, परभणी व हिंगोली या तिन्ही जिल्हयातील माजी सैनिक व त्यांच्या अवलंबितासाठी नांदेडला सीएसडी कॅटीन सुरु करण्यात येणार आहे. यासाठी स्मार्ट कार्ड, आधार कार्ड, पीपीओ व ओळखपत्राची प्रत जमा करण्याबाबत एक महिण्यापुर्वी कळविले होते. ज्या माजी सैनिकांनी अदयापपर्यत वरील कागदपत्रे जमा केली नाही. त्यांनी गुरुवार 20 ऑक्टोबर 2022 पर्यत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात जमा करावी. अन्यथा त्यांना सीएसडी कॅटीनची सुविधा घेता येणार नाही, असे सैनिक कल्याण अधिकारी महेश वडदकर यांनी कळविले आहे.